- Marathi News
- सिटी क्राईम
- मित्राचे इमोशनल ब्लॅकमेल : तरुणीने घरातून चोरून आणून दिले १० लाखांचे दागिने, दीड लाखाची रोकड, मित्रा...
मित्राचे इमोशनल ब्लॅकमेल : तरुणीने घरातून चोरून आणून दिले १० लाखांचे दागिने, दीड लाखाची रोकड, मित्राने केली ऐश..., हडकोतील धक्कादायक घटना
3.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मित्राच्या इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडत १९ वर्षीय मुलीने घरातून १० लाखांचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोकड चोरून त्याला आणून दिली. त्याने या पैशांवर ऐश केली. रक्षाबंधनला मुलाने घालायला म्हणून अंगठी मागितल्यानंतर आईने कपाट उघडले. त्यातील सर्व दागिने गायब झाल्याचे पाहून हादरलेल्या आईने मुलीची कसून चौकशी केली तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीच्या आईने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मुलगी आणि तिच्या मित्राविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-१,४४,२६४ रुपयांची एक सोन्याची चेन
-१९,३६२ रुपयांची कानातील सोन्याची इयरिंग जोड
-१ लाख ६७ हजार २२९ रुपयांची एक सोन्याची चैन
-९६ हजार ४२५ रुपयांचे सोन्याचे नाणे
-१ लाख २ हजार ५४४ रुपयांची सोन्याची अंगठी
-७७ हजार ३०० रुपयांचा सोन्याचा वेढा अंगठी
-९६ हजार २३३ रुपयांचा सोन्याचा वेढा, अंगठी
-२० हजार ६३२ रुपयांचे सोन्याचे पदक व राशी
-१६ हजार ८९३ ग्रॅमची सोन्याची अंगठी
२२ हजार ७४७ रुपयांच्या सोन्याच्या दोन बाळ्या
१ हजार २२३ रुपयांच्या चांदीच्य दोन अंगठ्या
१ लाख ४९ हजार ४८५ रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र
५५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातले व जोडवे
१ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम
अशा एकूण ११ लाख ४० हजार ६६५ रुपयांच्या ऐवजावर सायलीने डल्ला मारला.
खाण्या-पिण्यावर उडवले पैसे...
पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख यांनी मंगेशला ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सायलीला भावनिक करत दागिने, पैसे घेऊन येण्यास सांगितले. एके रात्री तिने बकेटमध्ये सर्व दागिने, पैसे टाकून खिडकीतून खाली सोडले. दागिने विकून खाण्या-पिण्यावर पैसे उडवल्याचे तो म्हणाला. त्याने दागिने कुठे विकले, पैशांचे काय केले, याचा तपास आता केला जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख करत आहेत.