करोडीच्या आरटीओ कार्यालयात तरुणाचा राडा!; अधिकारी महिलेला धमकावले..., नक्की काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी आलेल्या युवकाने छत्रपती संभाजीनगरच्या करोडी येथील आरटीओ कार्यालयात शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास राडा केला. दौलताबाद पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. राजू हरिसिंह सोनवणे (वय ३९, रा. दरेगाव पाडळी, ता. खुलताबाद) असे त्याचे नाव आहे.

चाचणीत गाडी नीट चालवता येत नसल्याने सहायक मोटार वाहन निरीक्षक राजश्री साळुंखे यांनी राजूला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे तो चिडला. मला कसे काय नापास करता, तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी त्याने राजश्री यांना देत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे आरटीओमधील परवाना चाचणीचे काम काही काळ थांबले. आरटीओतील अधिकाऱ्यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना कळवले. दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी आरटीओ कार्यालयात येत राजूला ताब्यात घेतले. राजश्री संजय साळुंखे (वय ३२) यांच्या तक्रारीवरून राजूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रफीक पठाण करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software