२० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या, सिल्लोड शहरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २० वर्षीय तरुणाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना सिल्लोड शहरातील जयभवानीनगरात गुरुवारी (१९ फेब्रुवारी) रात्री ९:३० वाजता घडली.

आर्यन रवींद्र भालेराव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सिल्लोड शहर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. आर्यनने गळफास घेतल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी धावून त्याला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सपकाळ यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. तपास पोलीस अंमलदार बारकू तडवी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software