फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  आईला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून काठी डोक्यात घालत जखमी करणाऱ्या पुत्राविरुद्ध सिडको पोलिसांनी गुरुवारी (१९ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेडकरनगरमध्ये बुधवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी १ च्या सुमारास घडली.

सुशिलाबाई बाबुराव कसारे (वय ५५, रा. आंबेडकरनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती, मुलगा संतोषसह राहतात. त्या आणि त्यांचे पती मजुरी काम करतात. तक्रारीनुसार, संतोष दारू पिण्याच्या सवयीचा आहे. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास त्या घरी स्वयंपाक करत असताना संतोष दारू पिऊन आला. तो सुशिलाबाई यांना म्हणाला, की फॅन चालू कर...सुशिलाबाईंनी फॅन चालू न केल्याच्या कारणावरून संतोषने वाद घालून शिवीगाळ करत सुशिलाबाई यांना हाताचापटाने मारहाण केली. काठी डोक्यात मारून डोके फोडले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात येऊन सुशिलाबाईंनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संतोषविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विद्या राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software