- News
- सिटी क्राईम
- ७ वर्षीय चिमुकलीवर सावत्र पित्याकडून अत्याचाराचा प्रयत्न, वाळूज MIDC तील घटनेने संतापाची लाट उसळली...
७ वर्षीय चिमुकलीवर सावत्र पित्याकडून अत्याचाराचा प्रयत्न, वाळूज MIDC तील घटनेने संतापाची लाट उसळली, महिलांनी एकत्र येऊन नराधमाला दिला चोप, पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव भागात ७ वर्षांच्या चिमुकलीवर सावत्र वडिलानेच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि शेजाऱ्यांच्या धाडसामुळे नराधमाचा प्रयत्न फसला. या घटनेची माहिती द्यायला सुरुवातीला पोलीस नकारच देत होते. नंतर जेव्हा पत्रकारांनी स्वतःहून घटनास्थळावरून माहिती घेतली तेव्हा पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत पावले उचलली, अशी चर्चा आहे.
पीडित चिमुकलीच्या आईने दुसरे लग्न केले असून, तिची आई आणि सावत्र वडील मजुरी करतात. घटनेवेळी आई घराबाहेर गेली होती. मद्यधुंद सावत्र वडिलाने घरात चिमुकलीला एकटे पाहून तिचे कपडे काढून मांडीवर बसवले. नराधमाने अश्लील चाळे सुरू करताच घाबरलेल्या चिमुकलीने आरडाओरड केली. तरीही तो तिला सोडत नव्हता. तिने त्याच्या हाताला जोरात चावा घेतला आणि घराबाहेर पळ काढला. ती थेट शेजाऱ्यांच्या घरात धावत गेली. परिसरातील महिलांनी एकत्र येत नराधमाला पकडून चोप दिला आणि पोलिसांना कळवले.
पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
दरम्यान, या संवेदनशील घटनेची माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. यामागे पोलिसांची काय भूमिका होती, हे कळू शकले नाही. मात्र प्रकरण पत्रकारांपर्यंत गेल्याने तातडीने गंभीर पावले उचलण्यात आली, अशी चर्चा सुरू आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
By City News Desk
भरधाव टिप्परने घेतला दुचाकीस्वाराचा बळी!; शिऊरजवळील घटना
By City News Desk
२० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोड शहरातील घटना
By City News Desk
नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
By District Correspondent
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
By District Correspondent
Latest News
21 Feb 2026 14:28:35
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...

