चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वऱ्हाडींना घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबावर धडकून एका महिलेचा जागीच मृत्यू तर ८ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) पहाटे ३:३० च्या सुमारास वांगी बुद्रूकजवळील (ता. सिल्लोड) आंबा फाट्यावर घडला. विद्युत तारा ट्रकवर पडल्याने ३५ वऱ्हाडींच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. गस्तीवरील पोलिसांनी धाव घेऊन तारा बाजूला केल्या. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

रेखाबाई वसंत गोसावी (रा. बोदवड, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीरामपूरला लग्नासाठी जळगावचे वऱ्हाड घेऊन आयशर ट्रक (क्र. एमएच १९ सीएक्स ३२५४) शुक्रवारी पहाटे जात होता. चालकाला डुलकी लागल्याने ट्रक रस्त्याखाली उतरून विजेच्या खांबाला धडकला. खांब आडवा होऊन तारा तुटून ट्रकवर पडल्या. तारांचे ट्रकवर घर्षण होऊन स्पार्किंग होऊ लागली. यामुळे ट्रकमधील ३५ वऱ्हाडी घाबरून आरडाओरड करू लागले. याच वेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकूर हेही कळताच सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी आले.

पोलिसांनी तत्काळ लाकडाच्या मदतीने ट्रकवरील विजेच्या तारा बाजूला केल्या. वायरमनशी संपर्क करून वीजपुरवठा खंडित केला. ट्रकमध्ये अडकलेली लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह ३५ वऱ्हाडींना सुरक्षित बाहेर काढले. जखमींना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर आयशर वाहनाचा चालक पळून गेला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमींपैकी रेखाबाई गोसावी यांचा मृत्यू झाला असून, ब्रह्मा गोसावी, प्रमिलाबाई गोसावी, सविता गोसावी, निर्मलाबाई गोसावी, सरुबाई गोसावी, वसंताबाई कोळी, ममता कोळी (रा. शेलगाव, ता. जामनेर, जि. जळगाव), सुरेश गोसावी (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हे ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software