ना विरोधी पक्षनेते राहिले, ना आमदार... अंबादास दानवेंची काढून घेतली ‘वाय प्लस’ सुरक्षा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद राहिले नाही, विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी ४ महिन्यांपूर्वीच संपला आहे, त्यामुळे सरकारने त्यांना दिलेली ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा काढून घेतली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (२० फेब्रुवारी) हा निर्णय घेतला आहे.

गृह विभागाकडून आदेश मिळताच छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाने दानवेंच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना परत बोलावून घेतले. विरोधी पक्ष नेते किंवा आमदार नसतानाही इतके दिवस त्यांच्याकडे सरकारी वाहन व पोलीस कर्मचारी तैनात होते. गृह विभागाच्या आढाव्यानंतर व सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारशीनुसार तातडीने सुरक्षा काढून घेण्यात आली. या निर्णयाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software