सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारने स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवले. यात दोन्ही तरुण जखमी झाले आहेत. सिडको पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. ही घटना सिडको एन ७ मध्ये आंबेडकरनगरजवळ घडली.

साहील खान बाबू खान (वय १९, रा. मिसारवाडी) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो रोजंदारीवर पेंटर काम करतो. १५ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तो व त्याचा मित्र आमेर खान (वय २०, रा. मिसारवाडी) स्कुटीने (MH20 HP 5101) आंबेडकरनगरमार्गे रिलायन्स पेट्रोलपंप एन ७ सिडकोकडे जात होते. आमेर स्कुटी चालवत होता. आंबेडकरनगरमधून निघाल्यानंतर आंबेडकर चौक ते वोखार्ड टी या बाजूने रस्‍त्याचे सिमेंट क्राँकिटकरणाचे काम सुरू आहे, त्या बाजूने वाहतूक बंद होती. वोखार्ड टी ते आंबेडकर चौक या रस्त्याचे काम पूर्ण झालेले असल्याने त्या बाजूने वाहतूक वळविण्यात आलेली होती.

या रस्‍त्‍याने आमेर स्कुटी चालवत असताना समोरून येणाऱ्या सुसाट कारने स्कुटीला धडक दिली. यात साहील व आमेर गंभीर जखमी झाले. स्कुटीचेही नुकसान झाले. धडक देणारा कारचा चालक न थांबता कारसह पळून गेला. नागरिकांनी दोघांना रिक्षातून अमान हॉस्पिटलमध्ये दाखल केले. धडक देणाऱ्या ब्रेझा सिल्व्हर कारचा क्रमांक MH21 BF3949 असल्याचे साहिलला कळल्याने याने या कारच्या चालकाविरुद्ध सिडको पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार ज्ञानोबा जोमदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software