पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, २१ फेब्रुवारीला सकाळी सुमारे ८.१५ वाजता ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर घडली.

संग्राम धोंडीराम शिंदे (वय २३, मूळ रा. सांगली) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव असून, तो १६०० मीटर धावताना चक्कर येऊन कोसळला. संग्रामला तत्काळ घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. संग्रामचे पोलीस दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने कठोर सरावही केला होता. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली.

धावत असतानाच तो मैदानावरच बेशुद्ध होऊन कोसळला. उपस्थित पोलीस अंमलदार, वैद्यकीय पथकाने तत्काळ प्राथमिक उपचार करून त्याला घाटी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेमुळे भरती प्रक्रिया काही काळ थांबली होती. संग्रामच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका किंवा तीव्र शारीरिक ताणामुळे त्याचा मृत्‍यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र अधिकृत कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software