लाजीरवाणे... विदेशी पाहुण्यांसमोरच गाइडला स्थानिक विक्रेत्‍यांची मारहाण, अजिंठा लेणी येथील प्रकाराने संताप, कठोर कारवाईची मागणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ विदेशी पाहुण्यांसमोर स्थानिक विक्रेत्‍यांच्या कृतीमुळे छत्रपती संभाजीनगरचे चुकीचे चित्र गेले आहे. या बेशरम विक्रेत्‍यांनी अजिंठा लेणी येथे गाइडला पर्यटकांसमोरच मारहाण केली. पाहुण्यांचे विमान असल्याने, गाइड त्यांना छत्रपती संभाजीनगरला तातडीने पोहोचविण्यासाठी प्रयत्‍नशील होता. ही घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) दुपारी घडली. घटनेला गांभीर्याने ओळखून पुरातत्‍व विभागाने मारहाण करणाऱ्या विक्रेत्‍यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या प्रकरणात पोलिसांत तक्रार करण्यात आलेली नसल्याने गाइड आणि त्‍या विक्रेत्‍यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. सूत्रांनी सांगितले, की शुक्रवारी सकाळी परदेशी पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी पाहून झाल्यानंतर दुपारी २ वाजता पर्यटकांना पुढील प्रवासासाठी वेळेचे बंधन होते. विमानाची वेळ जवळ आल्याने ते लेणीतून निघाले. लेणी परिसरातील शॉपिंग प्लाझातील काही विक्रेते पर्यटकांना हस्तकला व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आग्रह करत होते. मात्र वेळेअभावी पर्यटकांनी खरेदी टाळल्याने एक विक्रेता संतप्त झाला. गाइडमुळेच पर्यटकांनी खरेदी केली नाही, असा आरोप करत त्याने गाइडशी वाद घालायला सुरुवात केली. या विक्रेत्‍याला अन्य विक्रेत्‍यांची साथ लाभली. सर्वांनी मिळून गाइडला मारहाण केली. गाइड त्यांना विमानाची वेळ झाली असल्याने पर्यटक जात आहे, असे सांगत होता. मात्र तरीही विक्रेते न ऐकता मारहाण करत होते.

ही घटना शरमेची...
दरम्यान, ही घटना गाइडला मारहाण होण्यापुरती मर्यादित नाही. या घटनेमुळे विदेशी पाहुण्यांसमोर आल्या देशाचे नकारात्‍मक चित्र गेले आहे. त्यामुळे ही घटना पुरातत्‍व विभागाने गांभीर्याने घेऊन संबंधित विक्रेत्‍यांवर कठोर कारवाई करावी, त्यांची दुकान तिथून हुसकावून लावावीत, अशी मागणी होत आहे. काही महिन्यांपूर्वी एका देशी पर्यटकासोबतही छत्रपती संभाजीनगरऐवजी औरंगाबाद म्हण म्हणून स्थानिक विक्रेत्‍यांनी गैरप्रकार केला होता. स्थानिक विक्रेत्‍यांच्या उचापती गेल्या काही दिवसांत कमालीच्या वाढल्या आहेत. पोलिसांनी यात हस्‍तक्षेप करून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. या घटनेबाबत टूरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. सुभाष जाधव म्हणाले, की विदेशी पर्यटकांसमोर हा प्रकार घडल्याने जागतिक स्तरावर चुकीचा संदेश जातो. यावर कठोर निर्बंध घालावेत, असे ते म्हणाले. गाइड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भरत जोशी म्हणाले, की विमानतळावर पोहोचायचे होते. त्यामुळे पर्यटक निघाले. परंतु गाइडमुळेच पर्यटकांनी खरेदी केली नाही, असे वाटून विक्रेत्यांनी मारहाण केली. येथे वारंवार असे प्रकार होतात, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना

Latest News

पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला, जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरातील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुण कोसळला आणि त्याचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी...
सिडको एन ७ मध्ये हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीस्वार दोन तरुणांना उडवून पसार
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
दुचाकीला रानडुक्कर येऊन धडकले, वृद्धाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील दुर्घटना
चालकाला डुलकी, वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक विजेच्या खांबाला धडकून महिलेचा मृत्यू, ८ गंभीर जखमी, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software