पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले तर तिसऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यानंतर बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी तिन्ही भावांना अमानुष मारहाण केली. रक्तबंबाळ होऊन तिन्ही भाऊ कोसळल्यानंतर टोळके पळून गेले. ही घटना पिसादेवीतील दिशानगरीत शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

विजय विश्राम पवार (वय ३८, मारुती मंदिराजवळ माणिकनगर नारेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी व मुलासह राहतात. त्यांना दोन सख्खे भाऊ असून मोठे भाऊ राजू (वय ४४) व लहान भाऊ रवि हे दिशानगरी पिसादेवी येथे राहतात. तिघे भाऊ माऊली इंटरप्रायजेस शेंद्रा एमआयडीसी येथे फॅब्रीकेशनचे काम करतात. तक्रारीत म्हटले आहे, की  शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास विजय हे घरी असताना त्यांचा मित्र मयूर सुनिल निंबाळकर याने कॉल करून तुझ्यासोबत काम असून, तू हमसफर ट्रॅव्हल्स वर्कशॉप पिसादेवी येथे ये, असे म्हटले. त्यामुळे विजय हे त्याला भेटण्यासाठी तिथे गेले.  त्या ठिकाणी मयूर सुनिल निंबाळकर, रवि दीपक दांडगे, रमेश भिसे, आकाश चरभरे, विशाल दांडगे, सागर अस्वल, सागर लोंढे व इतर अनोळखी पाच ते सहा जण होते.

मयूर निंबाळकर हा विजय यांना म्हणाला, मी दारू व गुटखा विक्री करत असल्याबाबत तू पोलिसांना आमची टीप देतो. तू आमचा धंदा बंद करतो का?, असे म्हणून त्याने अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. मयूरसोबत असलेल्या सर्वांनी कमरेचे बेल्ट काढले व विजय यांना मारहाण करायला सुरवात केली. विजय यांनी तिथून पळ काढत पिसादेवीतील भाऊ राजू पवार यांचे घर गाठले व घडलेला प्रकार सांगितला. त्यांचा लहान भाऊही तिथे आला. नंतर मोठा भाऊ राजूने रवि दांडगेला फोन केला व माझ्या भावाला का मारले, अशी विचारणा केली. तुमचा काही गैरसमज झाला असेल. माझ्या भावाने पोलिसांना तुमची कोणतीही टीप दिलेली नाही, असे सांगितले.

आपण बसून बोलू, असे म्हटले. त्यावर रवि म्हणाला, तुम्ही थांबा. मी येतो तुमच्याकडे. रात्री सव्वा दहाला मयूर निंबाळकर, रवि दांडगे, रमेश भिसे, आकाश चरभरे, विशाल दांडगे, सागर अस्वल, सागर लोंढे हे सागर अस्वल याच्या रिक्षात बसून व इतर अनोळखी पाच ते सहा जण हे दोन ते तीन मोटारसायकलींवरून दिशा नगरी पिसादेवी येथे आले. विजय आणि त्यांचे दोन्ही भाऊ त्यांच्याकडे गेले. तिघे भाऊ येताच रवि दांडगे याने साथीदारांसोबत मिळून तिन्ही भावांवर हल्ला केला. रवि दांडगेने चाकूने राजू पवार यांच्या पोटात भोसकले. रमेश भिसे याने चाकूने रवि पवार यांच्या पोटात भोसकले. विजय त्यांना वाचविण्यासाठी धावले असता रवि दांडगे याने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने विजय यांच्या डोक्यात जोरात मारले. आकाश चरभरे, विशाल दांडगे, सागर अस्वल, सागर लोंढे यांनी कमरेचे बेल्ट व लाथाबुक्क्यांनी तिन्ही भावांना मारहाण करायला सुरुवात केली. तिघेही रक्तबंबाळ होऊन कोसळले. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले. नातेवाइकांनी तिन्ही भावांना घाटी रुग्णालयात दाखल केले. राजू पवार व रवि पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विजय यांच्या तक्रारीवरून ७ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software