३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात ३०० कोटी रुपये खर्चून १०६ सिमेंट रस्ते करण्यात आले. स्मार्ट सिटीमार्फत झालेली ही कामे बोगस झाल्याचे समोर येत आहे. अवघ्या काही वर्षातच रस्त्यांचा सरफेस (म्हणजे रस्त्याचा वरचा थर जो वाहनांच्या रहदारी, सुरक्षिततेसाठी आणि टिकाऊपणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो) खराब झाला आहे, खडी बाहेर येत आहे. १० वर्षांत रस्ते खराब झाले तर दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. त्यामुळे तशी सूचना एस. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीला करण्यात आली आहे. मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने २५ कोटींचे बिल स्मार्ट सिटीने थांबवून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आतापर्यंत कंत्राटदाराला २३० कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित १० टक्‍के सुरक्षा अनामत रक्कम व पॅचेस न भरल्यामुळे २५ कोटींची रक्कम देण्यात आलेली नाही. कंत्राटदाराने रस्त्याच्या कामात भराच कुचराईपणा केल्याचे आता दिसून येत आहे. रस्त्यांचा सरफेस अनेक ठिकाणी खराब झाला असून, ५०० पेक्षा अधिक पॅचेस खराब निघाले. हे पॅचेस बदलण्याचे आदेश स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. सरफेस खराब झाल्यामुळे रस्त्याची खडी उघडी पडली असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. २३० कोटी रुपये घेऊनही झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गैरव्यवहाराची शक्यता
३०० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेली रस्ता कामे बोगस होत असताना ज्यांच्यावर रस्ते दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी होती, ते कुठे होते, त्यांनी या कामांत कंत्राटदारासोबत मिळून गैरव्यवहार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software