माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी तो तिला बळजबरी करत असून, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. आज, २८ फेब्रुवारीला पहाटे २ ला त्याने हद्दच केली. घरात दगडफेक करून तिच्या भावाचा मोबाइलच चोरून नेला. ही घटना पुंडलिकनगर भागात समोर आली असून, पुंडलिकनगर पोलिसांनी रोडरोमिओविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईसाठी पावले उचलली आहेत.

२५ वर्षीय तरुणीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ती पुंडलिकनगर परिसरात आईकडे तिच्या मुलीसह दोन वर्षांपासून राहते. तिचे पती तीन वर्षांपूर्वी वारलेले आहेत. आज, २८ फेब्रुवारीला पहाटे दोनच्या सुमारास ती, तिची आई व भाऊ घरी झोपलेले असताना कुणीतरी घरात छोटे-छोटे दगड फेकले. त्यातील एक दगड घरातील कपाटाला लागून तरुणीसह तिची मुलगी किरकोळ जखमी झाले. तिच्या आई व भावाने बाहेर पाहिले असता कोणीच दिसले नाही. तिच्या भावाचा खिडकीत चार्जिंगसाठी लावलेला मोबाइल खिडकीतून हात घालून चोरीला गेल्याचे दिसले.

तरुणीने मोबाइल चोरीसह दगड फेकल्याचा संशय त्रिमूर्ती चौकात राहणाऱ्या एका तरुणावर व्यक्त केला आहे. हा तरुण तिच्या ओळखीचा असून, त्याने दोन दिवसांपूर्वी तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तो तरुणीला बळजबरी लग्न कर, असे धमकावत असतो. तिच्या आईलाही त्याने मोबाइलवर तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून द्या. नसता मी तिला पळवून घेऊन जाईल, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. त्याच्यापासून मला, माझ्या मुलीला,आई व भावाच्या जिवाला धोका असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशव कासारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software