घाटीतील डॉक्टरांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस!; कुत्र्याच्या ५० चाव्यांनी चाळणी झालेल्या चिमुकलीला इंजेक्शन देऊन घरी पाठवले, MIM नगरसेवकांच्या हस्‍तक्षेपावर पुन्हा दाखल करून घेत उपचार सुरू!!

प्रसिद्धीसाठी हपापलेल्या डॉ. सुक्रेंचा यंत्रणेवरचा वचक हरवलाय का?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असूनही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. नारेगावमध्ये शनिवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे ३ च्या सुमारास मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने ४ वर्षीय चिमुकलीच्या शरीराचे इतके लचके तोडले, की अक्षरशः चाळणी झाली. ५० हून अधिक ठिकाणी चावा घेऊन नखांनी जखमी केले आहे. या मुलीवर घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आयशा मुनावर सय्यद (वय ४, रा. नारेगाव) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. रमजान महिन्यानिमित्त सहरसाठी तिचे कुटुंबीय पहाटेच उठले होते. आयशा घराच्या दारात उभी होती. कोणाला काही कळण्याच्या आत ५ ते ६ मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला आणि लचके तोडायला सुरुवात केली. तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि तिची कुत्र्यांपासून सुटका केली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी १ इंजेक्शन दिल्यानंतर ३ नंबर वॉर्डात पाठवले. तिथून २४ नंबर वॉर्डात जा, अशी टोलवाटोलवी करण्यात आली. जवळपास २ तास जखमी चिमुकलीला घेऊन पालक या वॉर्डातून त्या वॉर्डात फिरत होते. त्यानंतर सुटी झाली, घरी जा, असे सांगून परत पाठविण्यात आले. ही बाब कळताच महापालिकेतील विरोधी पक्षनेते अब्दुल समीर, नगरसेवक काकासाहेब काकडे, मतीन पटेल यांनी नारेगाव गाठले. चिमुकलीला पुन्हा घाटीत दाखल केले. त्यानंतर आयेशावर उपचार सुरू करण्यात आले. आयेशाची आई पतीपासून विभक्‍त राहते. नारेगावमध्ये आजोबाकडे राहून कंपनीत कामगार म्हणून जाते.

घाटी रुग्णालयातील गलथान कारभार आणि डॉक्टरांचा कामचुकारपणा नवीन नाही. आता तर असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचे दिसून आले. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. प्रसिद्धीसाठी धडपडणारे घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांचा यंत्रणेवर वचक राहिला नसल्याची टीका या घटनेमुळे होत आहे. दरम्यान, या घटनेबाबत डॉ. सुक्रे म्हणाले, की चिमुकलीला पुन्हा भरती करून घेतले असून, अधिष्ठातांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला डिस्‍चार्ज देऊ नये, असे आदेश बालरोग विभागाला दिले आहेत. या प्रकरणात तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास वरिष्ठ डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. मनपाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख यांनी घाटी रुग्णालयात जाऊन जखमी मुलीच्या प्रकृतीबद्दल कुटुंबीयांकडे विचारपूस केली. नारेगाव भागातील चार मोकाट कुत्रे पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महापौर समीर राजूरकर यांनी रात्री उशिरा घाटीत जाऊन जखमी चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपचारात कमतरता पडणार नाही, असे आश्वासित केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software