वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर शहराजवळील नारंगी धरणात २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी साडेदहाला समोर आली.  रोहित विलास काटे (वय २७, रा. धरणग्रस्तनगर, वैजापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रोहित शनिवारी सकाळी नारंगी धरण परिसरात गेला होता. त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगलेला दिसून आला. त्याने आत्महत्या केली ही अपघाताने तो धरणात पडला, हे अद्याप समोर आलेले नाही. तो अविवाहित होता. माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. वैजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software