पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलतच झाडाला घेतला गळफास!; बीड बायपासची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलतच ३४ वर्षीय शासकीय ठेकेदाराने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना बीड बायपासवरील एका हॉटेलसमोर शनिवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ५ च्या सुमारास समोर आली.

योगेश नारायणराव सोळुंके (वय ३४, ह. मु. अरुणोदय कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. जालना) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. योगेश पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलत बोलत झाडाजवळ गेले आणि गळफास लावून घेतला. रस्त्याने जाणाऱ्यांनी हे दृश्य पाहून तातडीने पोलिसांना कळवले. चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत योगेश यांना फासावरून काढून चिकलठाण्याच्या मिनी घाटी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद चिकलठाणा पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software