बजाजनगरच्या तनवाणी कॉलेजमध्ये विद्यार्थिनीशी शिक्षकाचे गैरवर्तन!; व्हिडीओ व्हायरल, शिक्षकाला बेदम चोपले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील लेट भैरोमल तनवानी ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीच्या नातेवाइकांसह शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संशयित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल सखदेव यांनी तनवाणी विद्यालयाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. या घटनेबाबत अद्याप पोलिसांत तक्रार नसल्याचे सांगण्यात येते.

नक्की काय घडलं?
विद्यार्थिनीच्या नातेवाइकांच्या आरोपानुसार, तनवाणी ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी परीक्षेचे केंद्र आहे. विद्यार्थिनी दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकते. बारावी परीक्षा देण्यासाठी तिला तनवाणी कॉलेजचे केंद्र मिळाले होते. पेपर देत असताना शिक्षक स्वप्निल इंगळे याने तिला मोबाइल नंबर मागितला. बुधवारी (२५ फेब्रुवारी) बायोलॉजीचा पेपर झाल्यावर विद्यार्थिनीने शिक्षक इंगळेची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. इंगळे हा २०२३ पासून तनवाणी कॉलेजमध्ये कार्यरत असून, प्रयोगशाळा सहायक आहे. परीक्षा केंद्रावर गार्ड म्हणून नियुक्त होता. आरोपानुसार, इंगळे हा विद्यार्थिनीला वारंवार फोन करून त्रास देत होता. तिने कुटुंबीयांना याबाबत सांगितल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी तनवाणी कॉलेज गाठले.

शिक्षकाने चूक कबूल केली…
संस्थाचालकांसमोर इंगळेला बोलावून जाब विचारण्यात आला. त्यावेळी त्याने चूक कबूल केली. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी शिक्षकाला मारहाण केली. संस्थाचालकांनीही मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसते. गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, शिक्षणविस्तार अधिकारी अनिल सखदेव हे या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहेत. मुख्याध्यापक अर्चना जाधव म्हणाल्या, की तनवाणी कॉलेजने शिक्षकाकडून ७ दिवसांत खुलासा मागितला असून, त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. पुढील निर्णय संस्थेच्या स्तरावर घेतला जाईल. गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे म्हणाले, की वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही कॉलेजमध्ये जाऊन माहिती घेतली. सविस्तर अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
शिक्षकाने लाज सोडली...
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परीक्षेदरम्यान अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. संबंधित शिक्षकाविरुद्ध अद्यापही तनवाणी कॉलेजने पोलिसांत तक्रार केलेली नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software