थापटी तांडाच्या वादग्रस्त कुलस्वामिनी कला केंद्रावर ३०० ग्रामस्थांचा हल्ला!; १२ वाहने फोडली, ‘शौकिनां’ना दांडक्यांनी चोपले, नृत्यांगणांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : थापटी तांडा (ता. पैठण) येथील वादग्रस्त कुलस्वामिनी कला केंद्रासमोर शनिवारी (२८ फेब्रुवारी) रात्री ११ च्या सुमारास मद्यधुंद व्यक्तींनी रस्त्याने जाणाऱ्या रजापूरच्या तरुणाला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. एकाने बंदुकीतून हवेत गोळीही झाडली. त्यानंतर रजापूरच्या ३०० ग्रामस्थांनी कला केंद्रावर हल्ला चढवत तोडफोड केली. दगडफेकीत ४ जण जखमी झाले आहेत. नृत्य पाहण्यासाठी आलेल्यांसह नृत्यांगणांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले.

संतप्त ग्रामस्थांनी कला केंद्राचा मुख्य लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल तसेच विद्युत उपकरणांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. पार्किंगमध्ये उभ्या १० ते १२ कारच्या काचा फोडल्या. ग्रामस्थांचा रौद्रावतार पाहून नृत्य पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची पळापळ झाली. ग्रामस्थांच्या हल्ल्याची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. कला केंद्रात नृत्याच्या नावाखाली बरेच काही होत असते. त्यामुळे शौकीन दूरदरून येत असतात. यामुळे परिसराचे नाव खराब होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. हे कला केंद्र बंद करण्यासाठी आडूळसह २० गावांतील ग्रामस्थांनी आंदोलने केली, मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. मात्र अद्यापही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या वरदहस्तामुळे कला केंद्र सुरूच आहे. त्याचा राग ग्रामस्थांनी यानिमित्ताने काढला. ग्रामस्थांनी नृत्‍य पाहण्यासाठी आलेल्या शौकिनांना लाकडी दांडक्यांनी चोप दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software