छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ भीषण अपघातांत ४ ठार, वैजापूर, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ वेगवेगळ्या अपघातांत ४ जणांचा मृत्यू झाला. वैजापूर आणि सिल्लोड शहराजवळ हे अपघात घडले. चारही जण दुचाकीवर स्वार होते. अयान रमजान शहा (वय १९) आणि अरमान शरीफ शेख (वय १९) (दोघे रा. खंडाळा, ता.वैजापूर), शरद शामराव साखळे (३८, रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) आणि अमोल जनार्दन भोसले (रा. आडगाव भोसले, ता. कन्नड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत रमजान सणासाठी कपडे खरेदी करायला खंडाळा येथील अयान शहा, अरमान शेख आणि फैसल लाला खान (वय २०) हे वैजापूरला शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी तीनच्या सुमारास दोन दुचाकींवरून येत होते. वैजापूर शहरापासून ५ कि.मी. अंतरावरील जरुळ फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकींना उडवले. धडक बसताच दुचाकीचे एक चाक निखळून लांब फेकले गेले. मदतीला धावलेल्या ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून अयानला मृत घोषित केले. अरमानला छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात येत असतानाच वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. अपघाताची नोंद वैजापूर पोलिसांनी घेतली असून, पसार वाहनाचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील लिहाखेडी बसस्थानकाजवळ शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) दुपारी ३ ला दुचाकीला अल्टो कारने उडवले. यात शरद साखळे (रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) यांचा मृत्यू झाला. ते दुचाकीने (क्र. एमएच २९ बीएम ०८४३) सिद्धेश्वर जिनिंगजवळून जात असताना गोळेगावकडून येणाऱ्या अल्टो कारने (क्र. एमएच १४ ईसी ९१७७) त्यांना उडवले. साखळे गंभीर जखमी झाले. त्यांना भाजप नेते सुरेश बनकर यांनी स्वतःच्या कारमधून छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्‍यू झाला. साखळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी आहेत.

तिसऱ्या घटनेत सिल्लोड-कन्नड मार्गावरील धानोरा फाट्याजवळ शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी १२ च्या सुमारास दुचाकीला भरधाव आयशर टेम्पोने धडक दिली. यात आडगाव भोसले येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल भोसले यांचा मृत्यू झाला. त्यांची आई गीताबाई गंभीर जखमी झाल्या. ते धार्मिक कार्यासाठी भोकरदनला दुचाकीने (क्र. एमएच २० ईबी ०९४३) जात होते. आयशर टेम्पोने (क्र.. एमएच २० जीझेड ४९२८) त्यांना उडवले. अपघाताची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software