वायर चोरी करणाऱ्या चोरट्याची सुरक्षारक्षकासह चौघांनी केली हत्या!; सातारा परिसरातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वायर चोरीसाठी आलेल्या ४० वर्षीय चोरट्याचा सुरक्षारक्षकाने तिघांसोबत मिळून बेदम मारहाण करून खून केला. ही धक्कादायक घटना सातारा परिसरातील हमालवाडा येथील मराठवाडा स्पन पाइप कंपनीजवळ घडली. पोलिसांनी आज, २८ फेब्रुवारीला या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवले असून, चौघा मारेकऱ्यांना अटक केली आहे.

ऋषिकेश बबन वक्ते (वय २५), रोहित संतोष नगराळे (वय १९), चंद्रकांत भाऊसाहेब मारकळ (वय २१), राहुल बाबुराव दुतोंडे (वय २४, सर्व रा. खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर) अशी संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मृतक चोराची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटवणे सुरू आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की १८ फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास हमालवाडा येथील मराठवाडा स्पन पाइप प्लॉट नं. १ येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. डॉक्टरांनी बेदम मारहाणीसह कुठल्या तरी शस्त्राने त्याची हत्या झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पोलिसांना तपासात असे समोर आले, की मराठवाडा स्पन पाईप कंपनी परिसरात वायर चोरीचे प्रमाण वाढले आहे. १८ फेब्रुवारीलाही दुपारी मृतक चोरटा वायर चोरी करत असल्याचे तेथे कार्यरत सुरक्षारक्षक राहुल दुतोंडे याने पाहिले. त्याने त्याच्या मित्रांना सांगितले. नंतर चौघांनी मिळून त्या चोरट्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार,  पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, पोलीस अंमलदार दिगंबर राठोड, सुनिल पवार, सुनिल बेलकर, संदीप चिंचोले, सचिन काळे, दिनेश भुरेवाल, सुरेश काळे, सुभाष पाचे, कल्याण निकम यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना

Latest News

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
वायर चोरी करणाऱ्या चोरट्याची सुरक्षारक्षकासह चौघांनी केली हत्या!; सातारा परिसरातील धक्कादायक घटना
संशयावरून पतीचा मोबाइल तपासला, महिलेसोबत दिसले चॅटिंग!, पुढे जे घडलं ते धक्कादायक..३० वर्षीय विवाहितेने सांगितली करमाड पोलिसांना आपबिती!!
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software