तरुणीला ‘इंस्टाग्राम'वरील आंधळी मैत्री पडली महागात!; व्हिडिओ कॉल, न्यूड चित्रीकरण, मग ब्लॅकमेलिंग... नक्की काय घडलं... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सोशल मीडियाने अवघे जग एका क्लिकवर आणले असले तरी याच सोशल मीडियाचा स्वैर वापर किती महागात पडू शकतो, याची प्रचिती मुंबईतील एका तरुणीसह तिच्या कुटुंबियांना आणणारे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. ‘इंस्टाग्राम' या सोशल मीडिया साइटवर आंधळेपणाने केलेली मैत्री या तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप देणारी ठरली आहे. एका तरुणाने या तरुणीशी ओळख वाढवून नंतर व्हिडिओ कॉल करीत तिचे थेट नग्न चित्रीकरण केले आणि मग तिला व तिच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करून मोठी रक्कम उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. आता मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या क्राइम ब्रांचने या प्रकरणात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट पाठवणाऱ्या तरुणाने आधी तिला आपण दिल्लीतील रहिवासी आणि लंडन येथील बिझनेसमन असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्याला भुलून तरुणीने कोणताही विचार न करता मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला. पुढे तरुणीचा त्या तरुणाशी ऑनलाइन संवाद सुरू झाला. ओळख वाढल्यावर व्हिडिओ कॉल देखील सुरू झाले. मैत्री घनिष्ट झाल्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअपवर देखील संवाद सुरू झाला. यानंतर या तरुणाने स्वतःचे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. सहा सप्टेंबर रोजी तरुणीला व्हिडिओ कॉल करून कपडे उतरविण्यास भाग पाडले. पीडित तरुणीला बोलण्यात गुंतवून त्या नराधमाने तिचे त्या अवस्थेतील चित्रीकरण करून घेतले.

ब्लॅकमेलिंग सुरू 
तरुणीचा न्यूड व्हिडिओ हाती येताच त्या तरुणातील ब्लॅकमेलर जागा झाला. दुसऱ्याच दिवशी न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आधी लंडनचा बिझनेस मॅन असल्याचे सांगणारा तरुण आता आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तसे न करण्याच्या बदल्यात त्याने तिच्याकडे आधी १८ हजार रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने  तिने त्याला बँक खात्यात १८ हजार रुपये ट्रान्स्फर केले. विशेष म्हणजे हे पैसे मिळाल्यानंतरही त्या तरुणाने न थांबता तो व्हिडिओ तरुणीच्या भावासह तिच्या वडिलांना पाठवून दिला आणि त्यांच्याकडे देखील मोठ्या रकमेची मागणी केली. 

पोलिसांनी केला पर्दाफाश 
एकदा, दोनदा पैसे देऊनही त्या तरुणांकडून ब्लॅकमेलिंग थांबायचे नाव घेत नव्हते. अखेर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेली रक्कम भिवंडी येथील मोहम्मद शादाब मोहम्मद मुस्ताक अन्सारी याच्या खात्यावर जमा झाल्याचे उघड झाले. त्याने ही रक्कम मोहम्मद ताहा मोहम्मद मुजाहिद अन्सारी याच्या खात्यावर पाठवली होती. ताहा अन्सारी याने या रकमेतून क्रिप्टोकरन्सी खरेदी करून विदेशात राहणाऱ्या चकस खान त्याच्या खात्यावर ती रक्कम पाठवल्याचे उघड झाले. पोलिसांनी आता या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील आंधळी मैत्री किती महागात पडू शकते याचे उदाहरण दाखवणारी ही घटना तरुण मंडळींच्या व विशेषत: तरुणींच्या डोळ्यात अंजन राहणारी ठरली आहे. एक छोटीशी चूक या प्रकरणात अडकलेल्या तरुणीसह तिच्या कुटुंबीयांसाठी मानसिक त्रासाला जबाबदार ठरली. हे प्रकरण आता उघड झाले असले तरी पोलिसांनी या प्रकरणातून धडा घेऊन तरुण, तरुणींना ऑनलाईन मैत्री करताना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software