प्रेम ठोकरणाऱ्या तरुणीला जिद्दीने प्रेमात पाडले, वेळोवेळी शरीरसंबंध ठेवून नंतर दिला लग्नास नकार!; छत्रपती संभाजीनगरची धक्कादायक घटना, प्रियकराला अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुरुवातीला प्रेमाचा प्रस्ताव ठोकरणाऱ्या तरुणीला नंतर जिद्दीने प्रेमात पाडून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध क्रांती चौक पोलिसांनी बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अक्षय सुरेश पुंड (वय २५, रा. फाजलपुरा) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. ३० वर्षीय युवतीने त्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

युवतीच्या तक्रारीनुसार, काही वर्षापूर्वी अक्षयने तिला प्रेमाची मागणी घातली. मात्र, तिने त्या वेळी नकार दिला होता. मात्र नंतर त्यांच्यात संवाद वाढला. मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अक्षयने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. मात्र नंतर अक्षयच्या वागण्यात बदल होत गेला. त्याने युवतीशी संपर्क कमी करून चक्क टाळायला सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने अक्षयविरुद्ध ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याची तक्रार क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर संतापलेल्या अक्षयने पोलीस ठाण्याबाहेर तरुणीला बोलावून जातिवाचक वक्तव्य केले. ‘तू मला सुरुवातीला नकार दिल्याने बदला म्हणून तुझा वापर केला,' असे म्हणत त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने पुन्हा पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी अक्षयला अटक केली असून, अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software