- News
- पॉलिटिक्स
- ती ५ मिनिटे, महापौरांचा इशारा अन् एमआयएम नगरसेवकांची वाढलेली धाकधूक!, विशेष सभेत काय घडलं, कोणत्या
ती ५ मिनिटे, महापौरांचा इशारा अन् एमआयएम नगरसेवकांची वाढलेली धाकधूक!, विशेष सभेत काय घडलं, कोणत्या समितीचे कोण सदस्य...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेची विशेष सभा गुरुवारी (५ मार्च) सकाळी साडेअकराला सुरू झाली. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्यांनी स्थायी समिती सदस्यपदासाठी पक्षाने निवडलेल्या नगरसेवकांच्या नावाची यादी महापौर समीर राजूरकर यांच्याकडे दिली. मात्र एमआयएमचे गटनेते हाजी शेरखान सभागृहात हजर नव्हते. महापौरांनी एमआयएमला ५ मिनिटांचा अवधी दिला. वेळेत एमआयएमची यादी न आल्यास प्रक्रिया पुढे नेली जाईल, असा इशारा दिला. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली. एक मिनिट बाकी असतानाच गटनेते आले अन् या नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर स्थायी समितीसह ५ विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली.
कोणत्या समितीत कोण?
स्थायी समितीत निवडलेले सदस्य : भाजपकडून कमलाबाई रामचंद्र नरोटे, राजगौरव हरिदास वानखेडे, सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी, रवि साहेबराव कावडे, अनिल श्रीकिशन मकरिये, अर्चना शैलेंद्र निळकंठ, माधुरी मिलिंद देशमुख (अदवंत),अप्पासाहेब विनायकराव हिवाळे. एमआयएमकडून खान अब्दुल मतीन, मेराज खान जलील खान, पठाण मजहर पठाण अय्युब, अल्मास खान अमजद खान. शिंदे गटाकडून : श्वेता सुमित त्रिवेदी आणि राजू मानसिंह राजपूत. ठाकरे गटाकडून सचिन सूर्यकांत खैरे. वंचित बहुजन आघाडीकडून अमित भुईगळ.
वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समिती : भाजपकडून पदमसिंग राजपूत, सुनीता सोळुंके, कमल थोरात, सीमा साळवे. ठाकरे गटाकडून अब्दुल रशीद खान मामू हमीद खान. एमआयएमकडून मतीन शेख, जोहरा समीर बिन हैदर, मोहंमद वाजेद मोहंमद अय्युब. शिंदे गटाकडून यशोदा शेळके.
गलिच्छ वस्ती निर्मूलन, घरबांधणी व समाजकल्याण समिती : भाजपकडून अशोक दामले जालिंदर शेंडगे, अनिता साळवे, मीना खरात. ठाकरे गटाकडून सावित्रीबाई हिरालाल वाणी. शिंदे गटाकडून छाया विजय वाघचौरे. एमआयएमकडून काकासाहेब काकडे, सुनीता मनोज वाहुळ, भाग्यश्री संजय साळवे.
माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती : भाजपकडून अर्चना चौधरी, सुमित्रा म्हात्रे, दया गायकवाड, नंदलाल गवळी. ठाकरे गटाकडून सुनीता मधुकर सोनवणे. शिंदे गटाकडून प्रेमलता मिलिंद दाभाडे. एमआयएमकडून सय्यद उसामा अब्दुल कदीर, झीनत युनूस पटेल, मोहंमद वसीम अहमद.
शहर सुधार समिती : भाजपकडून रामेश्वर भादवे, सविता कुलकर्णी, रामदास हरणे, मयूर वंजारी. ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे. शिंदे गटाकडून अभिजित जीवनवाल. एमआयएमकडून अली मीर वाजिद, शेख साबेर पाशू, तरन्नुम अकील अहेमद.

