- News
- सिटी डायरी
- ...तर १६ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर शहराचे पाणी बंद!; पाटबंधारे विभागाची महापालिकेला लेखी नोटीस, ६...
...तर १६ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर शहराचे पाणी बंद!; पाटबंधारे विभागाची महापालिकेला लेखी नोटीस, ६५ कोटी रुपये थकले
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण येथील जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभाग महापालिकेकडून दरमहा बिल वसूल करतो. मात्र, महापालिकेने बिल वेळेत न भरल्याने तब्बल ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे आता जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला नोटीस बजावून १५ मार्चपर्यंत एकरकमी ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपये भरा अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
आम्हाला सहाव्या, आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. सिडको एन ५ पाण्याच्या टाकीसमोरील प्रभागाला चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी वाटप सुरू आहे. सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणी द्या, अशी मागणी सिडको एन ३ प्रभागाचे नगरसेवक प्रमोद राठोड, बालाजी मुंडे यांनी आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन केली. गुलमोहर कॉलनी, सिडको एन ५ परिसर आदी भागात चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. एकाच जलकुंभावरून वसाहतींना पुरवठा होतो. मग सिडको एन ३ भागात सहाव्या, आठव्या दिवशी पाणीपुरवठा का, असा प्रश्न केला. दरम्यान, महापौर समीर राजूरकर यांनी समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती दिली. पाणीपुरवठ्यातील गॅप एक दिवसाने कमी होईल, याची अंमलबजावणी १५ मार्चपासून होण्याची शक्यताही राजूरकर यांनी व्यक्त केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 06:57:00
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...

