मानसिंह पवार यांच्यासह ९ जणांची हकालपट्टी!; कन्नड येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गैरव्यवहार प्रकरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कन्नड येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार यांच्यासह ९ जणांची सहधर्मादाय आयुक्त आर. एस. पावसकर यांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी केली आहे. पवार यांनी त्यांच्या संस्थेच्या जमिनीवर प्लॉट करून ते परस्पर विकले. यासोबत इतर गैरव्यवहारात ते दोषी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कन्नड येथील संस्थेच्या ताब्यातील सावित्रीबाई फुले कन्या शाळेसमोरील जागेवर प्लॉट पाडून विक्री केल्याचा आरोप मानसिंग पवार यांच्यावर आहे. या संस्थेचे अध्यक्ष मानसिंग पवार आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पंढरीनाथ निकम, सचिव चंद्रकांत देशमुख, सदस्य संचालक डॉ.आनंदराव महाले, कृष्णाराव पाटील, बाबासाहेब मोहिते, चिंतामणराव मोरे, डॉ. डी. डी. शिंदे, अशोक आहेर या नऊ जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. संस्थेचे संचालक बिपिन थोरात, दिलीप पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे १९ मे २०१६ रोजी याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्यावर ९ वर्षे, ९ महिने, ८ दिवसांच्या सुनावणीनंतर निर्णय आला आहे. निर्णय अशावेळी आला आहे, की मोरे, डॉ. शिंदे, आहेर यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software