मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांची निवड आज, ५ मार्चला झाली. शिंदे गटाच्या दोन सदस्यांत मंत्री संजय शिरसाट यांची कन्या किंवा पूत्र यांचा समावेश असेल, अशी चर्चा होती. मात्र शिरसाटांनी यावेळी कन्या-पुत्राला पुढे करण्याऐवजी समर्थकांना पुढे केले. त्यातही असे समर्थक पुढे केले, ज्यांना जंजाळ गटाचा विरोध होणार नाही. त्यामुळे नगरसेवक श्वेता त्रिवेदी व राजू राजपूत यांना स्थायी समितीत काम करण्याची संधी मिळाली आहे.

सध्या महापालिकेतील शिंदे गटाची वाटचाल उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्त्वात सुरू आहे. पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनीच त्यांचे नेतृत्त्व पुढे केले आहे. त्यामुळे मंत्री शिरसाट यांनी महापालिकेत लक्ष घालणे काहीसे कमी केल्याची चर्चा आहे. या कारणामुळे शिरसाट गटाचे नगरसेवक सध्या सैरभैर झाले आहेत. स्थायी समिती निवडणुकीत शिरसाट यांच्यासाठी जंजाळांवर टीका करणाऱ्यांना संधी मिळणार नाही, हे निश्चितच होते. मात्र शिरसाट यांचे पूत्र सिद्धांत किंवा कन्या हर्षदा यांच्यापैकी एकाला तरी संधी मिळेल, अशी चर्चा होती.

मात्र श्वेता त्रिवेदी आणि राजू राजपूत यांना संधी मिळाली. त्यामुळे शिरसाट गटाला धक्का बसल्याचे मानले जात असले तरी, हे दोन्ही नगरसेवक शिरसाट यांचे समर्थकच मानले जातात. त्यामुळे शिरसाटांनी यावेळी कन्या-पुत्राऐवजी समर्थकांना पुढे केले आणि संधी मिळवून दिल्याची चर्चा आहे. स्थायी समितीत भाजपचे आठ, एमआयएमचे चार आणि शिंदे गटाचे दोन, ठाकरे गटाचे एक आणि वंचित बहुजनच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. स्थायी समिती महापालिकेतील निर्णयप्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

स्थायी समितीत निवडलेले सदस्य असे :
भाजप : कमलाबाई रामचंद्र नरोटे, राजगौरव हरिदास वानखेडे, सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी, रवि साहेबराव कावडे, अनिल श्रीकिशन मकरिये, अर्चना शैलेंद्र निळकंठ, माधुरी मिलिंद देशमुख (अदवंत),अप्पासाहेब विनायकराव हिवाळे.
एमआयएम : खान अब्दुल मतीन, मेराज खान जलील खान, पठाण मजहर पठाण अय्युब, अल्मास खान अमजद खान.
शिंदे गट : श्वेता सुमित त्रिवेदी आणि राजू मानसिंह राजपूत.
ठाकरे गट : सचिन सूर्यकांत खैरे.
वंचित बहुजन आघाडी : अमित भुईगळ.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोटारसायकल अपघाताच्या किरकोळ कारणावरून सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुढीलाइन भागात दोन गट भिडले....
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना
टीव्ही सेंटर चौकात दोन टवाळखोरांची पोलिसाला बेदम मारहाण, चाकूचे वार करून केले रक्तबंबाळ, पोलीस आहे तर काय झालं... म्हणत सुरू होता धिंगाणा
नाथषष्ठी यात्रेमुळे पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतूक मार्गात मोठा बदल, SP डॉ. राठोड यांनी काढले आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software