- News
- सिटी क्राईम
- Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभा...
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून बॅरिकेट्स लावून दीडच्या सुमारास तिघांनी जेवणासाठी डबे उघडले, तर अन्य तिघे काम करत होते. त्याचवेळी सुसाट कंटेनर ओव्हरटेकिंग लेनमध्ये बॅरिकेड्स उडवून घुसला. जवळपास २५० मीटर त्याने ट्रक फरपटत नेऊन थेट पुढील जेसीबीवर जाऊन आदळला. यात ट्रक व जेसीबीच्या मध्ये असलेले सहाही मजूर चिरडले गेले. तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (६ मार्च) दुपारी १:३० वाजता हा अपघात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर नाथनगर (वडखा) शिवारात घडला. हे कामगार दुभाजकाच्या क्रॅश बॅरिअर प्लेट बदलण्याचे काम करत होते.
तिन्ही कामगारांचे मृतदेह दुपारी ३ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची माहिती कळताच गणेशचे वडील, भाऊ आणि इतर नातेवाईक घाटी रुग्णालयात आले. मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. ज्ञानेश्वर घोरपडे व रामगोपाल पटेल यांच्यावर घाटीत उपचार केल्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शैलेंद्र रॉय यांनाही खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. ज्ञानेश्वर यांच्या छातीत उजव्या बाजूला रक्तस्त्राव झाला. रामगोपाल यांच्या डोक्याला, कानाला आणि मणक्याला मार लागला. शैलेंद्र किरकोळ जखमी आहेत. गणेश यांना २ मुले आणि एक मुलगी आहे. जखमी ज्ञानेश्वर आणि गणेश हे नातेवाइक आहेत.
समृद्धी महामार्गावर सततच्या अपघातांत दुभाजकाच्या कॅश बेरिअर प्लेट तुटत असतात. मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे या प्लेट दुरुस्ती व बदलण्याचे काम आहे. शुक्रवारी सकाळी ९ पासून मजूर प्लेट बदलत नाथनगर (वडखा) शिवारात पोहोचले होते. अपघातानंतर त्यांचे रस्त्यावर पडलेले डबे, अन्न पाहून सारेच हळहळले. अपघातानंतर तिन्ही वाहने रस्त्यावर आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक पूजा नांगरे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, किशोर चौधरी, चिकलठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पवार, महामार्ग पोलीस विभागाचे प्रभारी मोहन चव्हाण, गजानन लहासे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी दिलीप जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 06:57:00
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...

