बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोटारसायकल अपघाताच्या किरकोळ कारणावरून सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुढीलाइन भागात दोन गट भिडले. मोठा जमाव जमला. पोलिसांना कळताच त्यांनी तिथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (३ मार्च) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.

पोलीस अंमलदार विजय निरलवाड  यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. मंगळवारी रात्री ते ड्युटी होते. रात्री सव्वा दहाच्या सुमारास सिटी चौक पोलिसांना माहिती मिळाली, की बुढीलाईन येथील जामा मशिदीसमोर काही लोक आपसात भांडण करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी लगेचच तिथे धाव घेतली. औरंगाबाद हॉटेलच्या समोर पोलीस गेले असता तिथे मोठा जमाव जमलेला होता. त्यांच्यात भांडण सुरू होते. पोलिसांनी भांडण सोडवून सर्वांना नाव, पत्ता विचारला.

यात फराज कैसर खान (रा. आसेफिया कॉलनी), इंजमाम अझर खान (रा. आसेफिया कॉलनी), आवेज आरेफ खान (रा. आसेफिया कॉलनी),  बासीद अब्दुल हाफिज (रा. बुढीलाईन), महम्मद अशहर महमद अझर (रा. बिसमिल्ला कॉलनी), अफनान अमजद खान (रा. बिसमिल्ला कॉलनी), मोबीन रहीम शेख (रा. मिसारवाडी), मुस्तफा सय्यद शब्बीर (रा. बु‌ढीलाईन) यांचा समावेश होता. मोटारसायकल अपघाताच्या किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू असल्याचे चौकशीत समोर आले. अधिक तपास पोलीस अंमलदार मुनीर पठाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोटारसायकल अपघाताच्या किरकोळ कारणावरून सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुढीलाइन भागात दोन गट भिडले....
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना
टीव्ही सेंटर चौकात दोन टवाळखोरांची पोलिसाला बेदम मारहाण, चाकूचे वार करून केले रक्तबंबाळ, पोलीस आहे तर काय झालं... म्हणत सुरू होता धिंगाणा
नाथषष्ठी यात्रेमुळे पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतूक मार्गात मोठा बदल, SP डॉ. राठोड यांनी काढले आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software