माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाकू घेऊन गल्लीत फिरत असल्याने महिलांनी एकत्र येऊन बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे संतापलेल्या गल्लीगुंडाने त्यातील एका महिलेच्या मुलाला गाठून चाकूचे वार करत जखमी केले. माझ्यावर आधी ३०७ आहे, आता ३०२ करून टाकीन... असे धमकावले. बेगमपुरा पोलिसांनी या गल्लीगुंडाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्यापारी प्रदीप पोपटराव काळे (वय ३०, रा. उद्धवराव पाटील शाळेमागे सावित्रीबाई फुलेनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी (३ मार्च) सकाळपासून त्यांच्या गल्लीतील प्रविण खरात हातात चाकू घेऊन गल्लीत फिरत होता व लोकांना धमकावत होता. त्यावरून गल्लीतील महिला त्याची तक्रार देण्यासाठी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत काळे यांची आईसुध्दा होती.

याच दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास काळे हे आयशा मशिदीजवळ असताना तेथे आला. त्याने शिवीगाळ करून, दुपारी तुझी आई गल्लीतील महिलांसोबत पोलीस ठाण्यात  का गेली होती? असे विचारले. त्याच्या हातातील चाकूने काळे यांच्या डोक्यावर वार केला. हाताचापटाने मारहाण करू लागला. माझ्यावर आधी ३०७ आहे, आता ३०२ करून टाकीन, असे त्याने धमकावले. काळे यांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी खरातविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी वाडेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोटारसायकल अपघाताच्या किरकोळ कारणावरून सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुढीलाइन भागात दोन गट भिडले....
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना
टीव्ही सेंटर चौकात दोन टवाळखोरांची पोलिसाला बेदम मारहाण, चाकूचे वार करून केले रक्तबंबाळ, पोलीस आहे तर काय झालं... म्हणत सुरू होता धिंगाणा
नाथषष्ठी यात्रेमुळे पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतूक मार्गात मोठा बदल, SP डॉ. राठोड यांनी काढले आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software