खा. कल्याण काळे दुबईवरून सुखरुप परतले, छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होताच भावना अनावर, म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे हे दुबईत अडकले होते. आज, ६ मार्चला ते सुखरुप विशेष विमानाने परतले असून, त्यांचे कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने विमानतळावर स्वागत केले. या वेळी डॉ. काळे यांना भावना अनावर झाल्याचे दिसले. त्यांच्यासह त्यांच्या वर्गमित्रांनी कुटुंबासह दुबई टूरचे आयोजन केले होते, मात्र इराण-इस्त्रायल युद्धामुळे ते सर्व दुबईत अडकून पडले होते.

642640351_18110378011740677_3221 (1)

डॉ. काळे यांच्या एका वर्गमित्राची मुलगी दुबईत राहते. तिने अनेकदा डॉ. काळे यांना कुटुंबासह दुबईला येण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे खा. डॉ. काळे, त्यांची पत्नी, दोन्ही वर्गमित्रांचे कुटुंबीय असे सर्व जण दुबईला गेले होते. २८ फेब्रुवारीला ते मुंबईहून दुबईला पोहोचले होते. मात्र त्यानंतर युद्ध सुरू होऊन आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला. डॉ. काळे आणि त्यांचे कुटुंबीय हॉटेलमध्ये सुखरुप राहिले. आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसह कुटुंबीय, मित्रपरिवाराने त्यांचे स्वागत केले. डॉ. काळे यांना भावना अनावर झाल्या. ते म्हणाले, की कार्यकर्ते, हितचिंतक, कुटुंबीय आणि मतदारसंघातील बांधवांनी केलेल्या प्रेमळ स्वागतामुळे मन भारावून गेले. दुबईमध्ये अडचणीच्या परिस्थितीत असताना सतत फोन करून विचारपूस करणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. विशेषतः भारतीय दूतावासाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही डॉ. काळे यांनी आभार मानले. आजपासून पुन्हा नव्या उर्जेने माझ्या मतदारसंघातील जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होत आपल्या सेवेसाठी अधिक जोमाने कामाला लागणार आहे, असे ते म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software