छत्रपती संभाजीनगरच्या शहर महिला काँग्रेसमध्ये चाललं काय?, आधीच गळती, त्यात अध्यक्षपदावरून भांडाभांडी!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : चांगल्या कार्यकर्त्या एक- एक करून पक्ष सोडून जात असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दोन नेत्यांमध्ये जोरदार जुंपलेली दिसत आहे. दिपाली मिसाळ आणि अनिता भंडारी अशी या दोन महिला नेत्यांची नावे असून, दोघींनीही पक्षाची महिला शहराध्यक्ष आपणच असल्याचा दावा केला आहे.

काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहर महिला काँग्रेसला गळतीचे ग्रहण लागले आहे. सरोज मसलगे,  विजया भोसले, मीनाक्षी देशपांडे या सातत्याने चर्चेत राहणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच शहर कार्यकारिणीतील गोंधळाला कंटाळून पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर पक्षाला सावरण्यासाठी काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी छत्रपती संभाजीनगर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती.

त्यात अध्यक्षपदाची धुरा दिपाली मिसाळ यांच्याकडे सोपविल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर लगेच अनिता भंडारी यांनी या यादीला आक्षेप घेत शहराध्यक्ष मीच असल्याचा दावा केला होता. मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ते असून, सदस्य नोंदणीतही सर्वाधिक पुढाकार मीच घेतला होता. असे असताना मला अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. हा माझ्यावरील अन्याय असून, यासंदर्भात मी लवकरच अलका लांबा यांची भेट घेणार असल्याचे भंडारी यांनी म्हटले आहे.

वैयक्तीक टिप्पणी सहन करणार नाही : दिपाली मिसाळ
दुसरीकडे आधी या पदावर राहिलेल्या आणि आता पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झालेल्या दिपाली मिसाळ यांनी मात्र भंडारी यांचा दावा खोडून काढला. कुणी कितीही दावा केला तरी पक्षाच्या अखिल भारतीय अध्यक्षांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आता कोण काय बोलते याच्याशी मला काही देणेघेणे नाही. अर्थात वैयक्तिक टिप्पणी मात्र मी सहन करणार नाही, अशा शब्दांत मिसाळ यांनी आपणच शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा असल्याचे स्पष्ट केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा !; छत्रपती संभाजीनगरचे RTO काढतंय झोपा !!

Latest News

खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा !; छत्रपती संभाजीनगरचे RTO काढतंय झोपा !! खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा !; छत्रपती संभाजीनगरचे RTO काढतंय झोपा !!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सध्या खासगी ट्रॅव्हलचालक प्रवाशांच्या खिशावर अक्षरशः दरोडा घालत आहेत. दुसरीकडे त्‍यांना वेसन घालण्यात...
शेतात विद्युत पंप चालू करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्‍यू, फुलंब्री तालुक्यातील दुर्दैवी घटना
पाकिस्तानमध्ये महिलांना दहशतवादी बनविण्यासाठी ऑनलाइन क्लास!
पहिले स्वदेशी स्टील्थ फायटर जेट... सावरण्याची संधीही न देता पहिल्या नजरेतच शत्रूंचा नाश करेल... १० आश्चर्यकारक वैशिष्ट्ये, वाचूनच भारतीय असल्याबद्दल छाती फुगेल...
जेईई मेन्स २०२६ : पहिल्या टप्प्याची परीक्षा २१ जानेवारीपासून, जाणून घ्या कधी भरावा लागेल फॉर्म
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software