- News
- पॉलिटिक्स
- त्र्यंबक तुपेंच्या नावावर शिक्कामोर्तब!; गटनेतेपदासाठी नगरसेवकांच्या सह्या घेतल्या, महापालिकेत स्थाय...
त्र्यंबक तुपेंच्या नावावर शिक्कामोर्तब!; गटनेतेपदासाठी नगरसेवकांच्या सह्या घेतल्या, महापालिकेत स्थायीसह विषय समित्या, स्वीकृत सदस्यांसाठी हालचाली गतिमान
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते कोण होणार, हा पेच अखेर संपला आहे. मुंबईहून आलेल्या पक्षनिरीक्षक विलास पारकर यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यात त्र्यंबक तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर नगरसेवकांच्या सह्या घेऊन एकत्रित काम करण्याची तंबीही देण्यात आली.
महापालिकेत आता स्थायी समिती सभापती व विषय समिती सभापतींच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीचे सभापतीपद भाजप स्वतःकडे ठेवून घेणार आहे. स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड केली जाते. हे सदस्य आपला सभापती निवडतात. ५ पैकी ३ विषय समित्यांचे सभापतीपदही भाजपला स्वतःकडे ठेवायचे आहे. या सभापतींना महापालिकेत स्वतंत्र दालन दिले जाते. ९ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठीही भाजपने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून, त्यातील जास्तीत जास्त सभापतीपदे भाजपला स्वतःकडे हवी आहेत. भाजपने ५७ नगरसेवक आहेत. जास्तीत जास्त नगरसेवकांना पदे देऊन समाधानी करण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे.
संख्याबळाच्या आधारे भाजपला ५ जणांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत आणता येणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा ७६ जणांना पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याचा शब्द दिला आहे. यातील ३० जणांत स्पर्धा आहे. त्यातील कोणत्या ५ जणांना संधी मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपला ५, एमआयएमला ३ आणि शिंदे गटाला १ स्वीकृत सदस्य महापालिकेत आणता येणार आहे. उर्वरित एका जागेसाठी इतर पक्षांचे एकत्रिकरण झाल्यास त्यांनाही आपला स्वीकृत सदस्य महापालिकेत आणता येईल.
ऐनवेळचा गोंधळ टाळणार
महापौर समीर राजूरकर यांनी काम शिस्तबद्धतेने व्हावे यासाठी खबरदारीची भूमिका घेतली असून, सर्वसाधारण सभेत ऐनवेळचे विषय आणून गोंधळ वाढू नये म्हणून नगरसेवकांना मांडायचा विषय आधी ८ दिवस आधीच आपल्याकडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

