४२ वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्या, कन्नड तालुक्यातील नादरपूरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नादरपूर (ता. कन्नड) येथील ४२ वर्षीय ज्ञानेश्वर हरिचंद्र जाधव यांनी राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी ९ च्या सुमारास समोर आली.

ज्ञानेश्वर यांनी गळफास घेतल्याचे नातेवाइकांना लक्षात येताच त्यांना तातडीने नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.  मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून जमादार किरण गंडे तपास करत आहेत.

पाझर तलावात मृतदेह आढळला
वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथील पाझर तलावात शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. काही ग्रामस्थांनी मृतदेह पाहिल्यानंतर विरगाव पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी मृतदेह तलावाबाहेर काढला. मृतदेह २५ ते ३० वयोगटातील व्यक्तीचा असून, ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलीस पाटील हिराबाई दहिटे यांच्या माहितीवरून विरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक अशोक माने अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software