- News
- सिटी क्राईम
- हर्सूलमध्ये सुसाट कारचा थरार; अनिकेतनंतर मनोजनेही घेतला शेवटचा श्वास!; हर्सूलमध्येच हिट ॲन्ड रनची घट...
हर्सूलमध्ये सुसाट कारचा थरार; अनिकेतनंतर मनोजनेही घेतला शेवटचा श्वास!; हर्सूलमध्येच हिट ॲन्ड रनची घटना, अल्पवयीन मुलाचा घेतला बळी!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जुना जकात नाक्याजवळ नियंत्रण सुटलेली सुसाट कार दुभाजकाला धडकल्यानंतर तीन वेळेस उलटून दोन तरुणांच्या अंगावर कोसळल्याची घटना ९ फेब्रुवारीच्या पहाटे दोनला घडली होती. गंभीर जखमी अनिकेत दिलीप निंबाळकर (वय २३, रा. लांजूळ, ता. खामगाव, जि. बुलडाणा) या विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्याचा मित्र मनोज सदाशिव भिलंग (वय २२, रा. केजवड, ता. रिसोड, जि. वाशिम) यानेही उपचारादरम्यान शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शेवटचा श्वास घेतला.
हर्सूल गावाजवळ गुरुवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्री सुसाट वाहनाने अल्पवयीन मुलाला धडक देऊन पळ काढला. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. उबेद जहीर पठाण (वय १७, रा. करीमनगर, हर्सूल) असे त्याचे नाव आहे. उबेद शिक्षण घेतानाच हर्सूलला भाजीपाला विकून आई-वडिलांना आर्थिक हातभार लावायचा. त्याच्या वडिलांचा अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. हर्सूल गावातील हनुमान मंदिराजवळ ते भाजीपाला गाडी लावतात. गुरुवारी रात्री काम संपवून उबेद घराकडे पायी निघाला. मात्र, फुलंब्रीच्या दिशेने जाणाऱ्या सुसाट वाहनाने त्याला धडक दिली. उबेद वाहनात अडकून दूरपर्यंत फरपटत गेला. कंबरेखालचा भाग वाहनाखाली आल्याने जागीच मृत्युमुखी पडला. उबेदच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

