गुबूगुबूऽऽऽ नंदी बैल आला... ब्लॅकमेलिंगचा टोळीने धंदा मांडला, सिडको एन ६ मध्ये सतर्क नागरिकाने केला भंडाफोड!; जे घडलं ते इतकं धक्कादायक, वाचूनच हैराण व्हाल...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ६ मधील साईनगरात नंदी बैल घेऊन फिरत भविष्य सांगण्याचा बनाव करून लोकांना गंडवणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा एका चालाख नागरिकाने भंडाफोड केला. सध्या ही टोळी फरार झाली आहे. टोळीतील एकाने तर चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून धूम ठोकली. आता सिडको पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या टोळीचे सदस्य लोकांना गंडवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करायचे. 

नक्की काय घडलं?
सिडको एन ६ मध्ये गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सकाळपासून सहा जण नंदी बैल घेऊन फिरत होते. कोणत्याही घरासमोर गेले की टोळीचा प्रमुख त्या कुटुंबातील प्रमुख सदस्याशी संवाद साधायचा. त्याच्याकडून माहिती घेऊन नंदीबैलाला खाणाखुणा करायचा. नंदीबैलाने मान डोलावली की त्यानुसार त्या कुटुंबाचे भविष्य सांगायचे. साईनगरमध्ये ओंकार प्रकाश शिराढोणकर यांच्या घरापुढे ते आले. टोळीच्या सदस्याने आवाज दिल्याने ओंकार यांचे वडील नंदीबैलासाठी तांदूळ घेऊन घराबाहेर आले. मात्र, टोळीप्रमुखाने त्यांना नंदीबैलासाठी पोळीभाजी आणण्यास सांगत बोलण्यात अडकवून ठेवले. त्यांच्याकडून घरातील माहिती घेण्यास सुरुवात केली.

दहा दिवसांत मृत्यू होणार...
टोळीतील एक सदस्य शिराढोणकर यांच्या घरात शिरला. त्याने टोळीतील इतर सदस्यांना पाणी देण्याचे सांगून ओंकार यांच्या मुलालाही घराबाहेर पाठवले. तो जाताच घरात घुसलेल्या व्यक्तीने शिराढोणकर यांच्या घरातील सदस्यांना कुटुंबातील सदस्यांची माहिती, पार्श्वभूमी, निधन झालेल्या व्यक्ती, आर्थिक उत्पन्नाचे साधन, पैठणमधील कारखाना अशी सर्व इत्यंभूत माहिती दिली. यामुळे शिराढोणकर कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला. एवढे सांगून तो भोंदूबाबा थांबला नाही तर त्याने ओंकार यांच्या पत्नीला पुढील दहा दिवसांत अर्धांगवायूने तुमचा मृत्यू होणार, असे सांगितले. यामुळे अख्खे शिराढोणकर कुटुंब हादरून गेले. त्याने ५० हजार रुपये दिल्यास या संकटावर मार्ग काढता येईल, असे सांगून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओंकार यांनी पैसे देण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या पत्नीने घरातून साडेतीन हजार रुपये आणून त्या भोंदूबाबाच्या हातावर ठेवले. यानंतर त्या बाबाने काही मंत्र पुटपुटून आता संकट टळल्याचे त्यांना सांगितले.

भीती घालून लुटायचे...
टोळी जाताच ओंकार यांनी ही टोळी अजून कुणाच्या घरी गेली होती आणि त्यांच्याकडून किती पैसे घेतले, याची माहिती मिळवली. टोळी अशीच भीती घालून लोकांना लुटत असल्याचे त्यांना कळले. यानंतर त्यांनी त्या टोळीतील एकाला फोन करून पुन्हा बोलावले. कारखान्यातील अडचणींवर मात करण्यासाठी काही उपाययोजना करावयाच्या आहेत, असा बहाणा केल्याने तो सदस्य ओंकार यांच्याकडे आला. तो येताच ओंकार यांनी त्याला पकडून कारमध्ये घातले आणि थेट सिडको पोलीस ठाणे गाठले. ओंकार हे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया करत असतानाच त्या भामट्याने पोलीस ठाण्याच्या आवारातूनच धूम ठोकली. दरम्यानच्या काळात ओंकार यांनी या भामट्यांच्या टोळीविरोधात रितसर तक्रार नोंदवली. पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत. दरम्यान, संध्याकाळी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप ओंकार शिराढोणकर यांनी केला आहे.

मायक्रोफोनचा करायचे वापर
भामट्यांची ही टोळी लोकांना गंडवताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. टोळीचा प्रमुख एखाद्या कुटुंबातील व्यक्तीशी बोलून त्याच्याकडून माहिती घेत असताना टोळीतील सर्व सदस्यांच्या कानात मायक्रोफोन होता. त्यामुळे तेथे होणारा संवाद सगळ्यांना कळायचा. महत्वाचे म्हणजे टोळीतील एक सदस्य संबंधितांच्या घरात गेल्यानंतर बाहेर सुरू असलेला संवाद ऐकूनच घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबाची इत्यंभूत माहिती द्यायचा. शिवाय बाकीचे सदस्य आसपास फिरून त्या कुटुंबाबाबत माहिती घेऊन ती मायक्रोफोनच्या साहाय्याने ‘त्या' घरात गेलेल्या आपल्या साथीदाराला कळवायचे. मग घरात गेलेला तो सदस्य त्या घरातील लोकांना भविष्याची भीती दाखवून पैसे उकळायचा. पैसे हाती पडले की ही टोळी काही क्षणातच त्या घरासमोरून निघून जायचे. एवढेच नाही तर एखाद्या कुटुंबाने पैसे द्यायला नकार दिल्यास या टोळीचे सदस्य त्यांना शिवीगाळ देखील करायचे, अशी माहितीही समोर आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!

Latest News

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी! क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...
गुबूगुबूऽऽऽ नंदी बैल आला... ब्लॅकमेलिंगचा टोळीने धंदा मांडला, सिडको एन ६ मध्ये सतर्क नागरिकाने केला भंडाफोड!; जे घडलं ते इतकं धक्कादायक, वाचूनच हैराण व्हाल...
दिल्ली गेट ते जहाँगिर कॉलनी सुसाट निघाली स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी गाडी... बघणाऱ्यांचा चुकला काळजाचा ठोका!; पुढे काय घडलं...
SHOCKING :  केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालायला लावू... शिक्षक उधळले..., चिकलठाण्यातील शारद सुमन शाळेतील प्रकार खळबळ
पैठणमध्ये अतिक्रमणे हटवताना पोलिसांशी व्यापाऱ्यांचा वाद; काही मिनिटांत बाजारपेठ झाली बंद..., पुढे काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software