आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post


छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) रात्री एक अनोळखी व्यक्ती बॅग विसरून गेला होता. शनिवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी ही बॅग उघडली तेव्हा त्यात चक्क एअरगन आढळली. सुरुवातीला ते पिस्तूल असल्याची अफवा पसरली. पण नंतर ती एअरगन असल्याचे समोर आले. पोलिसांनी काही तासांत सातारा परिसरातून संशयिताला अटक केली आहे. रितेश संतोष होळकर (वय २३, रा. साईनगर, सातारा परिसर) असे त्याचे नाव आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे. तो आ. केणेकरांना महापालिकेत कंत्राटी नोकरी लावून द्यावी, म्हणून भेटायला आला होता. 

भाजप आमदार केणेकर यांचे  क्रांती चौकाजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात रोज नागरिकांची येजा असते. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास कोणीतरी काळी बॅग कार्यालयात विसरून गेले. आमदारांच्या पीएने बॅग सुरक्षित उचलून ठेवून दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत आणि आज सकाळीही कुणीच बॅग घ्यायला न आल्याने पीएच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आ. केणेकरांना हा प्रकार सांगितल्यानंतर आज, १४ फेब्रुवारीला सकाळी बॅग तपासली असता त्यात चक्क पिस्तूल आढळले. त्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले.

सुरुवातीला पिस्तुल समजून आ. केणेकर यांचा संताप झाला होता. ते म्हणाले होते,  की मला सातत्याने धमक्या येत असून, अनेक घोटाळ्यांच्या तक्रारी मी केल्याने मला धमकवण्यासाठी हा प्रकार केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या पाहणीत पिस्तुल नाही तर एअरगन असल्याचे समोर आले. त्यानंतर आ. केणेकर म्हणाले, की तरुणाने हुडपणातून एअरगन बाळगली असेल तर त्याला त्रास होऊ नये अशी त्याच्या करिअरच्या काळजीपोटी माझी इच्छा आहे. दरम्यान, क्रांती चौक पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. कार्यालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून कोण ती बॅग कार्यालयात सोडून गेला, याचा तपास करण्यात आला. शनिवारी सायंकाळी रितेशला ताब्यात घेण्यात आले. तो बी. एस्सी.च्या तृतीय वर्षात शिकतो. काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असून, महापालिकेत कंत्राटी नोकरी मिळविण्यासाठी त्याला एकाने आ. केणेकरांचे शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी तो केणेकरांच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी आला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून मागवली होती. क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software