दिल्ली गेट ते जहाँगिर कॉलनी सुसाट निघाली स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी गाडी... बघणाऱ्यांचा चुकला काळजाचा ठोका!; पुढे काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दिल्ली गेटजवळून काळ्या काचा लावलेली स्कॉर्पिओ सुसाट जात असल्याचे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी पाठलाग सुरू केला. पुढे स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी... थरार पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला... स्कॉर्पिओ चालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही, तो थांबण्याचा नाव घेईना, अखेर जहाँगिर कॉलनीत कार सोडून दोघे पळू लागले. त्यातील एकाचा पाठलाग करून पोलिसांनी पकडण्यात यश मिळवले... त्याचा ‘बॉस’ मात्र फरारी झाला... बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली.

नितेश श्रीराम राठोड (वय २९, रा. फुलेनगर, पंढरपूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव असून, योगेश नंदू सांगळे (वय ३०, रा. स्वस्तिक सिटी) हा फरारी झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी बजाजनगरमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी अटक योगेश सांगळेला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. सशस्त्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोघे जात असल्याचा संशय आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की शहर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना दिल्ली गेटकडून काळ्या काचा असलेली स्कॉर्पिओ सुसाट जाताना दिसली.

वाघ यांनी पाठलाग करून चालकाला थांबायला सांगितले असता त्याने न थांबता वेगात कार दामटली. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवल्याने जहाँगीर कॉलनीत कार सोडून दोघे पळू लागले. वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून नितेशला पकडले. सांगळे पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस अंमलदार राजेश यदमळ यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२.५ इंच लांबीचा एक, तर दुसरा १९ इंच लांबीचा दुसरा चाकू, चारचाकी जप्त करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software