माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एका महिलेने मुलाच्या एमबीबीएसची फी भरण्यासाठी बँकेतून काढलेली ३० हजार रुपयांची बॅग सिडको ते टी-पॉइंट मार्गावरील वोखार्ड चौक परिसरात रस्त्यात हरवली. ती बॅग सापडताच सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे त्या महिलेला परत करून माणुसकीचे दर्शन घडवले. गुरुवारी (१२ फेब्रुवारी) ही घटना घडली.

वोखार्ड चौक परिसरात रस्त्यालगत एक बॅग सापडल्यानंतर आंबेडकरनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश सुरडकर, प्रताप मोरे आणि राजू गोटवाल यांनी ती बॅग उचलून पाहिली. त्यामध्ये बँकेचे पासबुक, आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच रोख ३० हजार रुपये असल्याचे आढळले. बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे त्यांनी भारतीय स्टेट बँकच्या जाधववाडी-हर्सूल शाखेशी संपर्क साधला. शाखा व्यवस्थापक जाधव यांच्या मदतीने संबंधित खातेदाराचा दूरध्वनी क्रमांक मिळवून संपर्क साधण्यात आला.

बॅग शालिनी गोखले (रा. छत्रपती संभाजीनगर) यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा मुलगा अमरावती येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असून, त्याची फी भरण्यासाठीच त्यांनी ही रक्कम काढली होती. बॅग हरवल्यामुळे त्या चिंतित होत्या. यानंतर त्यांना तातडीने बँक शाखेत बोलावण्यात आले. शाखा व्यवस्थापकांच्या उपस्थितीत रोख रक्कम रुपये ३० हजार तसेच सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. या प्रामाणिक कृतीबद्दल शालिनी गोखले यांनी संबंधित सामाजिक कार्यकर्त्याचे मनःपूर्वक आभार मानले. समाजात अजूनही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि या तिघांचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software