विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम आदींच्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करू नये. कारण असा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लँडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software