सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौराह किराणा चावडी येथील अग्रवाल केबल दुकान फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचे केबल चोरून नेले. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी सातला समोर आली.

रवीकुमार सुरेंद्रकुमार गुप्ता (वय ३९, रा. बीड बायपास छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे किराणा चावडी चौराह येथे अग्रवाल केबल नावाचे दुकान आहे. दुकानाच्या बाजूला गोडाऊन आहे. गोडाऊनमध्ये दुकानातील केबलचे सामान ठेवतात. बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री साडेआठला त्यांनी दुकान व गोडाऊन बंद केले.

गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी सातला त्यांची गाडी साफसफाई करणाऱ्या पप्पू नावाच्या तरुणाने कॉल करून सांगितले, की तुमच्या गोडाऊनचे शटर कोणीतरी फोडले आहे. गोडाऊनमधील केबलचे सामान बाहेर पडले आहे. त्यामुळे गुप्ता हे तातडीने तिथे गेले. चोरट्यांनी शटरचा कडीकोयंडा कट केलेला होता. नंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता ६० हजार रुपयांचे नवीन तीन तारी कॉपर केबल चोरीला गेल्याचे दिसले. अधिक तपास पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर फुके करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software