- News
- जिल्हा न्यूज
- ‘मेट्रोपोलिस पोस्ट’ वृत्ताची दखल : आता महाशिवरात्रीलाही घृष्णेश्वराचे गाभारा दर्शन खुले!; बंदीचा निर...
‘मेट्रोपोलिस पोस्ट’ वृत्ताची दखल : आता महाशिवरात्रीलाही घृष्णेश्वराचे गाभारा दर्शन खुले!; बंदीचा निर्णय मागे, प्रशासनाने राखला भाविकांच्या श्रद्धेचा मान
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर संस्थान आणि प्रशासनाने अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. ‘मेट्रोपोलिस पोस्ट’ने या संदर्भात रोखठोक वृत्त प्रसिद्ध करत गर्दीचे नियोजन करण्याऐवजी गाभारा बंद करून बाहेरून दरवाजातूनच भाविकांना दर्शन देण्याच्या निर्णयावर टीका केली होती. शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) गाभारा बंदीचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे महाशिवरात्रीलाही आता भाविकांना गाभाऱ्यात जाऊन श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. या निर्णयाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था वेरूळ गावापासून काही अंतरावर केली आहे. गावातील भगवान महावीर ते मालोजीराजे भोसले चौक या दरम्यानचा दोन्ही बाजूंचा रस्ता सर्व वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात येणार आहे. १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान धुळे- सोलापूर महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्याचे पत्रक पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी काढले आहे. त्यानुसार कन्नड, वेरूळ, खुलताबाद, दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहने कन्नड, वेरूळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील. छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील. फुलंब्री, सुलतानपूर, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

