भररस्‍त्‍यात गाठून तरुणावर कुऱ्हाडीचे घाव, वस्तऱ्याचे सपासप वार, रक्‍तबंबाळ होऊन कोसळताच हल्लेखोराने काढला पळ!, सोयगावमध्ये भरदिवसा थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डुक्कर चोरीचा आळ घेऊन २७ वर्षीय तरुणावर गावातीलच एकाने कुऱ्हाड व वसऱ्याचे वार करून प्राणघातक हल्ला केला. तरुण रक्तबंबाळ होऊन बराच काळ रोडवर पडलेला होता. सोयगाव पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन त्‍याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) दुपारी १२ च्या सुमारास सोयगाव शहरातील जुन्या मध्यवर्ती बँकेसमोर घडली.

रमेश शंकर सुरे (वय ४१, रा. जुना बाजार चौक, सोयगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ते वराह पालन करतात. कुटुंबासह राहतात. त्यांचा चुलत भाऊ सुरेश रामलाल सुरे (वय २७) हा त्यांच्या घराशेजारी एकटाच राहतो. सुरेशचे आई-वडील वारलेले आहेत. त्याला एक मोठा भाऊ सुनिल असून तो त्याच्या कुटुंबासह सुरेशच्या शेजारी राहतो. बुधवारी (११ फेब्रुवारी) दुपारी पाऊणच्या सुमारास गावातील दीपक बागूल यांनी रमेश सुरे यांना कॉल करून कळवले, की सुरेशच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ होऊन जुन्या मध्यवर्ती बँकेसमोर रस्त्यावर पडलेला आहे.

त्यामुळे रमेश यांनी लगेचच जुन्या मध्यवर्ती बँकेकडे धाव घेतली. तिथे सुरेश रक्तबंबाळ होऊन रोडवरच पडलेला होता. शेजारी लोखंडी कुऱ्हाड अर्धवट लाकडी दांडा तुटलेली व वस्तरा पडलेला दिसला. सुनिल सुरे यांनी पोलिसांना कळवल्याने तेही घटनास्‍थळी धावले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सुरेशला सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सुरेशला अधिक उपचारासाठी जळगावच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.
अंकुशने केला हल्ला...
गावातील अंकुश संतोष कुऱ्हाडे (रा. नारळीबाग सोयगाव) याने सुरेश सुरेच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने व वस्तऱ्याने तीन- चार वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत रमेश सुरे यांनी म्हटले आहे. यापूर्वीसुद्धा अंकुशने डुक्कर चोरण्याचा आळ घेऊन सुरेशला मारहाण केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून सोयगाव पोलिसांनी अंकुशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software