महायुतीचा आज रात्रीपर्यंत होणार अंतिम निर्णय!, अजित पवार गटाने मांडली वेगळी चूल!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही शुक्रवारी (२६ डिसेंबर) महायुतीत जागा वाटपावर तोडगा काढता आला नाही. मात्र ९९ टक्‍के निर्णय झाला असून, काही जागांवर तडजोड सुरू आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. ठाकरे गटातून भाजप आणि शिंदे गटात आलेले पदाधिकारी हे उमेदवारीच्या आशेनेच आलेले आहेत. त्यांना उमेदवारी देणे, त्याशिवाय पक्षातील इच्‍छुकांनी आधीपासून केलेली तयारी, यामुळे भाजप आणि शिंदे गट दोन्ही पक्षांची दमछाक होत आहे.

चिकलठाणा येथील भाजप विभागीय कार्यालयात बावनकुळे यांनी दिवसभर बैठका घेतल्या. मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची बैठक झाल्यानंतर रात्री उशिरा मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी गेले. तिथे दोन्ही पक्षांतील नेत्‍यांची चर्चा झाली. शिंदे गटाकडून जास्तीच्या जागा मागितल्या जात असल्याने भाजपची कोंडी होत आहे. दरम्‍यान, अजित पवार गटाने अधिक वाट न पाहता आपला वेगळा मार्ग निवडला असून, आमच्या पक्षाचे १०० उमेदवार निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली. भाजप- शिंदे गटात अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. यामुळे अजित पवार गटाने घराणेशाहीविरोधात रणशिंग फुंकून निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीत आम्‍ही लढणार नाही, असे स्‍पष्ट करण्यात आले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software