शहर विद्रूप करणाऱ्या बॅनरबाजीला आळा घाला : राजूरकर बॅनर काढायला गेले की कॉलवर धमक्या येतात : जी. श्रीकांत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील बॅनरबाजीला आळा घालण्यावरून महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी पुन्हा एकदा हतबलता व्यक्त केली. बॅनर काढायला गेल्यावर कोणा कोणाचे कॉल येतात, हे येथे सांगू शकत नाही. आता तर तुला सर्वसाधारण सभेत पाहून घेतो, अशा धमक्याही यायल्या लागल्या आहेत, असे सूर जी. श्रीकांत यांनी आळवला. महापौर समीर राजूरकर यांनी त्यांना बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप झाले असून, सर्व बॅनर काढा, असे आदेश दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर पोलिसांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) तापडिया नाट्यगृहात समन्वय बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, महापौर समीर राजूरकर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, तहसीलदार उमेश पाटील, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे आदींची उपस्थिती होती.

काय म्हणाले जी. श्रीकांत?
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, शहरात खांब दिसला की लाव बॅनर ही वृत्ती वाढली असून, अनधिकृत बॅनरवर कारवाई कधीही करू शकतो. मात्र, कारवाई करायला गेले की कॉल येतात. त्यांची नावे येथे सांगू शकत नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकही खांब रिकामा सोडला नाही, असे ते म्हणाले.

महापौर राजूरकर म्हणाले...
महापौर समीर राजूरकर म्हणाले, की अनाठायी खर्चाऐवजी व्याख्याने ठेवा. नव्या पिढीसमोर आदर्श उभा राहील, अशी आदर्श शिवजयंती साजरी करूया. एक शिवप्रेमी म्हणून मी महापालिका आयुक्तांना बॅनर काढण्यासाठी विनंती करतो.

तासभरात खड्डे बुजवणारी मशीन...
शहर खड्डेमुक्त केल्याचा दावा करत महापालिका आयुक्तांनी, एकही प्रश्न खड्ड्यांबाबत न आल्याचे समाधान व्यक्त केले. तासभरात खड्डे बुजवण्याचे मशीन महापालिकेने आणले असून, शिवजयंती मिरवणूक मार्गावरील प्रत्येक खड्डा बुजवला जाईल, असे सांगितले.

महिलांसाठी स्वतंत्र भाग तयार करा...
क्रांती चौकात दरवर्षी मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र दरवर्षी काही विकृती उत्सवात गोंधळ घालताना पहायला मिळते. महिला, मुलींची त्यामुळे कुचंबना होते. महिला, तरुणींसाठी बॅरिकेडिंग करून स्वतंत्र भाग तयार करण्याची मागणी महिलांनी केली आहे. जी. श्रीकांत यांनी स्वतःला आलेला कटू अनुभव या वेळी सांगितला. ते म्हणाले, की गेल्यावर्षी मी माझ्या एका मुलीला माँ जिजाऊ, दुसऱ्या मुलीला शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. त्यांना क्रांती चौकात जायचे होते. मात्र, गोंधळामुळे मुलींना घेऊन जाण्याची हिंमत झाली नाही. यंदाची शिवजयंती उत्साहात मात्र डीजेमुक्त, कुटुंबांना सहभागी होता येईल, अशी साजरी करा, स्वयंसेवकांनी पुढे या, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत शहरातील नशेखोरी, अस्वच्छतेचेही प्रश्न चर्चेत आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software