विदेशी  नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा

छत्रपती संभाजीनगरातील प्रकार; येमेनचा तरुणही ताब्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भारतात शिक्षणासाठी आल्यानंतर व्हिसाची मुदत संपून गेल्यावर चोरून देशात राहणाऱ्या येमेनच्या एका तरुणाला पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर विदेशी तरुणाला बेकायदेशीर आश्रय दिल्याप्रकरणी घरमालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येमेनचा नागरिक असलेल्या मोहम्मद अहेमद अली बिनशिखबुबकर (वय ३२) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छित होता. अहमद ऑक्टोबर २०१४ मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारतात आला होता. त्याने बंगळुरू येथे नोंदणी करून व्हिसा मिळवून २०१७ पर्यंत तेथे मुक्काम केला नंतर त्याच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतर तो बंगळुरू सोडून या शहरातून त्या शहरात दोन वर्षे ओळख लपवून राहिला. काही वर्षांपूर्वी त्याने छत्रपती संभाजीनगर गाठले. येथे शहरातील जयसिंगपुऱा भागात  २२०० रुपये देऊन किरायाने खोली घेतली.

तसेच या काळात तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तो प्रयत्न करत होता. तसेच यापूर्वी शहरात आलेल्या येमेन व अन्य देशांच्या तरुणांच्या तो संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद विरोधी कक्षाला त्याच्याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून त्याला पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाने १० फेब्रुवारीला ताब्यात घेतले. तसेच त्याला भाड्याने घर देऊन पोलिसांना त्याची माहिती न दिल्याप्रकरणी  घरमालक शेख नासेर शेख अजगर अली (रा. जयसिंगपुरा) याच्यावरही बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि. राजेश मयेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक मारोती मदेवाड तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software