घरात देवापुढे डीजे लावून नाचता का? मग शिवजयंती सोहळ्यात कसे चालेल?, पोलीस आयुक्‍तांनी डीजे आग्रह धरणाऱ्यांना केले गार!; छत्रपती संभाजीनगरात यंदा सोहळा डीजे, लेजरविना!, काय ठरलं समन्वय बैठकीत...

पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघणार, रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, गुंड प्रवृत्तींवर कडक निगराणी राहणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात सध्या शिवजयंती मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. शिवजन्मोत्सव सोहळा दोन दिवसांवर आल्याने शिवभक्तांचा उत्साह वाढत असून ते विविध मार्गांनी जयंती उत्सवाची तयारी करत आहेत. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव डीजेमुक्त वातवरणात पारंपरिक ढोलवाद्यांच्या गजरात साजरी केली जाईल. तसेच शिवजयंती लेजर मुक्त साजरी केली जाईल, असा निर्धार शिवजन्मोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

637748441_4249321898614402_59149

शहरातील तापडिया रंगमंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समन्वय समितीची बैठक सोमवारी (१६ फेब्रुवारी) पार पडली. या वेळी महापौर समीर राजूरकर, पोलीस युक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत डीजेला परवानगी देण्याची जोरदार मागणी केली. परंतु, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्याला ठाम नकार दिला. त्यावर पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत त्यांच्याशी वाद घातला. त्यावर तुम्ही तुमच्या घरात देवांपुढे दारू पिऊन, डीजे लावून नाचता का? मग शिवजयंती सोहळ्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर असे केलेले कसे चालेल? गतवर्षी डीजेमुळे अनेकांच्या कानाला गंभीर इजा झाली, असे स्पष्ट करत प्रवीण पवार यांनी झुंडशाही चालणार नाही, डीजे-लेजरला कुठल्याच प्रकारे परवानगी मिळणार नाही, असा कठोर इशारा दिला. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून आभार मानले.

असा असेल यंदाच्या शिवजयंती सोहळ्याचा थाटमाट...
-६१ ठिकाणी असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे
-यंदा शिवजन्मोत्सवानिमित्त २५ मिरवणुका, ७ मशाल रॅली निघणार
- ३५ ठिकाणी स्टेजद्वारे अभिवादन
-८० ठिकाणी महाराजांचे प्रतिमा पूजन
-८ ठिकाणी शिवचरित्र पारायणाचे आयोजन

महावितरण अधिकारी गायब
बैठकीला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. रस्त्यावर विजेचे खांब, डिपी आहेत. त्या हटवण्यासाठी ४० पेक्षा अधिक निवेदन दिले. दरवर्षी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सवात हा मुद्दा चर्चेत येतो. महावितरणकडून मात्र कुठलीच कारवाई होत नसल्याचे सांगत पदाधिकारी नागरिकांनी महावितरणच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली.

नागरिकांनी केल्या सूचना
सोहळ्याच्या अनुषंगाने नागरिकांनीही प्रशासनाला अनेक सूचना केल्या. सेव्हनहील, गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी चौक रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. गजानन महाराज मंदिर चौक, पुंडलिकनगर ते सिडको बसस्थानक रस्त्यावर मनमानी पद्धतीने अनेक ठिकाणी दुभाजक उघडण्यात आले आहे. यामुळे मिरवणुकीत अडथळा होतात. विविध मार्गांवर मुख्य रस्त्यावरचे बंद पथदिवे आहेत ते सुरू करावेत. ड्रेनेजचे वाहते पाणी बंद करावे. क्रांती चौकात महिला,तरुणींसाठी बॅरिकेटिंग करून स्वतंत्र जागा ठेवावी. क्रांती चौक उत्सवात चोरांचा शिरकाव होतो. त्याला आळा घालावा. ड्राय डे असतानाही होणारी दारूविक्रीला आळा घालावा. मिरवणुकीत नशेखोर आढळल्यास तत्काळ कारवाई करावी, आदी सूचना करण्यात आल्या.

हजार युवतींना फेटे बांधणार
क्रांती चौकात जन्मोत्सवात सहभागी होणाऱ्या ५ हजार युवर्तीचा फेटे बांधून सन्मान होणार आहे. शिवाय, १८ फेब्रुवारीला तापडिया नाट्यमंदिरात व्याख्यान होणार असल्याचे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software