जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरालगतच्या जमिनींना सध्या सोन्याचा भाव आला असून त्यातून अपहरण, खंडणीसारखे गुन्हे घडत आहेत. बीड बायपासलगतच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमीन वादातून ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त वन सहायक वनसंरक्षक अधिकारी एकनाथ कान्हेरे (वय ६८, रा. गारखेडा परिसर) यांचे गुंडांनी अंगावर केमिकल टाकून चक्क भरदिवसा अपहरण केले. तुमचा जमिनीवरील दावा सोडून द्या, अन्यथा तुमचे काही खरे नाही, असे धमकावत त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी व रोख रक्कम लुटली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कान्हेरे यांची चिकलठाणा बीडबायपास परिसरातील गट क्रमांक ६३१ मध्ये शेती आहे. शेतीच्या कामासाठी ते नेहमी तेथे जातात. रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी ते शेतात गेले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेताबाहेर येऊन कारमध्ये बसत असतानाच तेथे आलेल्या गुंडांनी त्यांना पकडले. त्यांच्या कारचा ताबा घेत त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. एकाने ड्रायव्हिंग सीटवर बसून इतर तिघांनी त्यांना सीटच्या खाली टाकत त्यांचे दोन्ही हात बांधून अंगावर रसायन टाकले होते.

मारहाण करत विविध भागांतून फिरवले
अपहरणकर्ते कान्हेरे यांना मारहाण सतत रून धमकावत होते. त्यांनी कान्हेरेंना विविध भागांतून फिरवले. तसेच कुणाला काही संशय येऊ नये म्हणून काही वेळाने रस्त्यावर कार थांबवून कान्हेरेंना दुसऱ्या कारमध्ये कोंबले. त्यात पुढे दोन तर मागे कान्हेरे यांना पकडून एक जण बसला होता. त्यांनी कान्हेरेंना उपवासासाठी खाण्यास दिले. मात्र, कान्हेरे यांनी नकार दिला. मोबाइलवर येणाऱ्या प्रत्येक कॉलवर खोटे बोलण्यास भाग पाडले. मुलाच्या कॉलवर देखील मंदिरात आल्याचे सांगण्यासाठी धमकावले. सायंकाळी ७ वाजता त्यांनी कान्हेरे यांना बदनापूर भागात पट्टी काढून, हाताची दोरी काढून सोडून दिले. स्थानिकांना मदत मागून कान्हेरे यांनी मुलाला संपर्क करून घर गाठले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software