दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच काळाने घातला घाला!; स्कुटीच्या धडकेने वृद्धाचा मृत्‍यू, हर्सूलची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडताच वृद्धाला स्कुटीस्वाराने उडवले. यात वृद्धाचा मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास हर्सूल येथील तुळजाभवानी मंदिरासमोर घडली.

नारायण इंदरसिंग चंदनसे (वय ४४, रा. आईसाहेबनगर, हर्सूल) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते फरशी बसविण्याचे काम करतात. त्यांचे वडील इंदरसिंग नामदेव चंदनसे (वय ७०) ११ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास स्‍नान करून दर्शनासाठी नायरा पेट्रोलपंपाजवळील तुळजा भवानी मंदिरात गेले. पायी परत घरी येत असताना सकाळी १० ला मंदिरासमोरच ॲक्टिवा स्कुटीने (क्र. एमएच २० जीए ६५७८) त्यांना धडक दिली. यात इंदरसिंग हे गंभीर जखमी झाले.

त्यांना नागरिकांनी एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्‍यान दुपारी २ वाजून १० मिनिटांनी त्यांचा मृत्‍यू झाला. स्कुटीचालकाचे नाव राहुल मोतीराज ढगे (वय २५, रा. भारज बुद्रूक, ता. जाफराबाद, जि. जालना, ह. मु. रुख्मिनी मेडिकलजवळ, पिसादेवी रोडजवळ) असे असल्याचे नारायण चंदनसे यांना कळले. त्यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात शनिवारी (१४ फेब्रुवारी) तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी राहुल ढगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software