सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील भवन (ता. सिल्लोड) परिसरात रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री झालेल्या एका भीषण अपघातात पालोद येथील ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले, तर अन्य एका घटनेत सोमवारी (१६ फेब्रुवारी) रात्री याच परिसरात मकाचा ट्रक उलटल्याने चालक जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावर तासभर वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी रात्री पालोद येथील सीताराम देवराव पालोदकर (वय ६०), सुरेश हिंगमिरे (वय ३५) आणि ईश्वर सुरडकर (वय ३१) हे कारने (क्र. एमएच १७ टी १३८५) सिल्लोडकडे जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला मागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारच्या मागील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या गंभीर जखमी झालेल्या सीताराम पालोदकर यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

खड्डे चुकवताना ट्रक झाला आडवा
याच मार्गावर अन्य एका घटनेत सोमवारी (दि. १६) रात्री ९ च्या सुमारास पूर्णा नदी पुलाजवळ जामनेर येथून मका घेऊन पुण्याकडे जाणारा ट्रक (एमएच १४ इएम २९७७) रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात उलटला. यात चालक नीलेश सानप (वय २९, रा. पुणे) जखमी झाला. ट्रक उलटल्याने मकाची शेकडो पोती महामार्गावर पडली होती, परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उपस्थित वाहनाधारकांनी रस्त्यावर विखुरलेली पोती उचलून बाजूला केल्यानंतर तासाभराने या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software