खडकेश्वरजवळील BSNL चौकात स्कोडा कारचालकाचा थरार, स्कुटीस्वार व्यावसायिक जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खडकेश्वरजवळील बीएसएनएल चौकात सुसाट स्कोडा कारने स्कुटीस्वार व्यावसायिकाला उडवले आणि पसार झाला. यात व्यावसायिक जखमी झाला असून, त्‍यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविवारी (१५ फेब्रुवारी) क्रांती चौक पोलिसांनी स्‍कोडा कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभिषेक भागचंद चुडीवाल (वय २६, रा. अरिहंतनगर, सिंधी कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते होमिओपॅथी डॉक्टर आहेत. ५ फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचे वडील भागचंद ग्यानचंद चुडीवाल (वय ६७) हे ज्‍युपिटर स्‍कुटीने (क्र. एमएच २०, जीए ३४४५) अरिहंतनगर येथून मोंढा नाका मार्गे बीएसएनएल चौक मार्गे खडकेश्वर येथील भावना एनएक्स दुकानावर जात होते. बीएसएनएल चौकात त्यांना स्कोडा कारने (क्र. एमएच १४, डीटी ३२२२) उडवले. त्यानंतर कारचालकाने वाहन न थांबवता वाहनासह सुसाट पळून गेला.

लोकांनी मदतीला धावून भागचंद चुडीवाल यांना रस्‍त्‍याच्‍या बाजूला घेतले व अभिषेक यांना कॉल केला. अभिषेक यांनी येऊन वडिलांना हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. नंतर मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सेंच्‍युरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्‍यांच्या पायाचे हाड मोडले असून, पायात रॉड टाकावा लागला. सध्या ते बेड रेस्टवर आहेत. रविवारी (१५ फेब्रुवारी) अभिषेक यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी स्कोडा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश लाठे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software